ग्रामीण डाकसेवकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:02 AM2018-06-06T00:02:10+5:302018-06-06T00:02:10+5:30
ग्रामीण डाकसेवकांनी विविध मागण्यांसंदर्भात ५ जून रोजी हिंगोली येथील टपाल कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : ग्रामीण डाकसेवकांनी विविध मागण्यांसंदर्भात ५ जून रोजी हिंगोली येथील टपाल कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
मागील पंधरा दिवसांपासून टपाल विभागातील ग्रामीण टपाल कमचाऱ्यांचा देशव्यापी संप सुरू आहे. त्या अनुषंगाने हिंगोली येथे मंगळवारी संपात सहभागी होऊन कर्मचाºयांनी धरणे आंदोलन केले. कमलेश चंद्र समितीच्या शिफारशी लागू कराव्या, सातवा वेतन आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी ग्रामीण डाकसेवकांनी आंदोलन केले.
अजूनही ग्रामीण भागात बहुतांश संपर्क टपालाच्या माध्यमातूनच होतो. डाक सेवकांच्या संपामुळे ग्रामीण भागात सध्या कोणतेही टपाल मिळत नाहीत. परंतु या सेवकांच्या मागण्यांसंदर्भात प्रशासन कोणतीच भूमिका घ्यायला तयार नाही. सातवा वेतन आयोग ग्रामीण डाक सेवकांना लागू करण्यासंदर्भात सेवकांनी यापुर्वीही आंदोलन संप केले. त्यावेळी आश्वासन देऊन अद्याप मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे आता परत डाकसेवक आता आंदोलन व संप करीत आहेत.
टपालसेवा विस्कळीत
कळमनुरी : तालुक्यातील टपालसेवा विभागातील कर्मचारी २२ मे पासून बेमुदत संपावर गेले. त्यामुळे टपालसेवा विस्कळीत झाली आहे. कळमनुरी तालुक्यातील २० टपाल कर्मचारी संपावर गेले आहेत. शासनदरबारी अनेकदा मागण्यासाठी पाठपूरावा व आंदोलने करूनही कर्मचाºयांना न्याय मिळत नाही. त्यामुळे आता मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन सुरुच ठेवण्यात येणार असल्याचे कर्मचारी सांगत आहेत.