कृषी विभागात अर्ध्यावर खुर्च्या रिकाम्याच ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:48 AM2018-06-20T00:48:39+5:302018-06-20T00:48:39+5:30

येथील तालुका कृषी कार्यालयाला अधिकाऱ्यांच्या विभागीय स्तरावरून झालेल्या बदल्यांचा मोठा फटका बसला आहे. या बदल्यांमध्ये तालुक्यातील प्रमुख सर्वच अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या जागी नवीन अधिकारी मात्र आले नसल्याने तालुका कृषी कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.

 In the Department of Agriculture, half of the chairs are empty! | कृषी विभागात अर्ध्यावर खुर्च्या रिकाम्याच ...!

कृषी विभागात अर्ध्यावर खुर्च्या रिकाम्याच ...!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : येथील तालुका कृषी कार्यालयाला अधिकाऱ्यांच्या विभागीय स्तरावरून झालेल्या बदल्यांचा मोठा फटका बसला आहे. या बदल्यांमध्ये तालुक्यातील प्रमुख सर्वच अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या जागी नवीन अधिकारी मात्र आले नसल्याने तालुका कृषी कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.
येथील तालुका कृषी कार्यालयांतर्गत प्रारंभीपासून कृषी सहायकाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. तालुक्यात एकूण ३६ कृषी सहाय्यकाची पदे मंजूर असून त्यापैकी केवळ १८ कार्यरत आहेत. या स्थितीत ३१ मे रोजी लातूर विभागीय स्तरावरून कृषी अधिकाºयांच्या झालेल्या बदल्यांमध्ये सेनगाव तालुका कृषी कार्यालयाला मोठा फटका बसला आहे. प्रमुख जबाबदार सर्व अधिकाºयांच्या बदल्या झाल्याने तालुका कृषी कार्यालय ओस पडले आहेत. कृषी विभागाने विभागीय बदल्या करताना रिक्त पदांचा समतोल राखण्याकडे दुर्लक्ष केल्याने सेनगाव तालुका कृषी कार्यालयाला एकही जबाबदार अधिकारी मिळाला नाही. परिणामी, तालुका कृषी कार्यालयाचा कारभार वाºयावर आहे.
येथील तालुका कृषी अधिकारी आर.बी. हारणे यांची परभणी जिल्हा परिषद येथे बदली झाली आहे. त्यांचे पद रिक्त झाले आहे. सेनगाव मंडळ कृषी अधिकारी पद चार वर्षांपासून रिक्त आहे. या पदाचा प्रभारी पदभार पाहणारे कृषी पर्यवेक्षक जी.आर. शिंदे यांची मानवत येथे बदली झाली आहे. साखरा मंडळ कृषी अधिकारी एस.एस. लिंबाळकर यांची उमरखेड येथे बदली झाली आहे. गोरेगाव मंडळ कृषी अधिकारी जी.जे. बळवंतकर यांची शिरडशहापूर येथे बदली झाली आहे. आजेगावचे पर्यवेक्षक बी.एम. शिंदे यांची औंढा येथे बदली झाली आहे. या सर्व अधिकाºयांच्या जागी तालुक्यात एकही नवीन अधिकारी आले नसल्याने तालुका कृषी कार्यालयाचे महत्त्वाची सर्व पदे रिक्त झाली आहेत. अशा स्थितीत तालुका कृषी अधिकाºयांचा पदभार देण्यासाठी तालुक्यात एकही मंडळ कृषी अधिकारी उरला नाही. त्यामुळे सेनगाव तालुका कृषी कार्यालयाचा कारभार विभागीय कृषी विभागाच्या धोरणामुळे अडचणीत आला आहे. तालुका कृषी कार्यालयातील महत्वाच्या पदाचा प्रभारी पदभार कोणाकडे द्यावा, या चिंतेत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय सापडले आहे. ऐन खरीप हंगामात महत्वाच्या अधिकाºयांची पदे रिक्त झाल्याने कृषी विभागाचे कामकाज ढेपाळले आहे. कार्यालयीन कामकाजावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. तालुका कृषी अधिकारी आर.बी. हारणे हे कार्यमुक्त झाले असून त्यांचा पदभार बदली झालेल्या मंडळ कृषी अधिकारी जी.जे. बळवंतकर, यांच्याकडे सोपविला आहे. बळवंतकर यांचीही शिरडशहापूर येथे बदली झाली असून त्यांचा पदभार कुणाकडे द्यावा, असा पेच कृषी विभागासमोर निर्माण झाला आहे. कृषी विभागातील महत्वाची रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज आहे.
कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांना अत्यल्प दरात बियाणांचे वाटप होत आहे. येथील तालुका कृषी कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी नसल्याने या वाटपात अनियमितता होत असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत.मात्र जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने तरी पर्याय देणे गरजेचे असताना तसे झाले नाही.
ऐन खरीप हंगामात शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाचा एकही अधिकारी कर्मचारी ग्रामीण भागात दौºयावर फिरताना दिसत नाहीत. त्यामुळे खते-बियाणे, औषधी संबंधित माहिती शेतकºयांना मिळत नसल्याचे चित्र आहे.
तालुका कृषी अधिकाºयांसह तीनही मंडळ कृषी अधिकारी, दोन पर्यवेक्षक असे एकूण ६ अधिकाºयांची तालुक्याबाहेर बदली झाली आहे. परंतु त्यांच्या जागी एकाही अधिकारी देण्यात आला नाही.

Web Title:  In the Department of Agriculture, half of the chairs are empty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.