परिवहन उपायुक्तांनी घेतला विविध कामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:20 AM2021-07-08T04:20:27+5:302021-07-08T04:20:27+5:30
७ जुलैरोजी उपप्रादेशिक कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीस परिवहन उपायुक्त दिनकर मनवर यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत हिंगोली ...
७ जुलैरोजी उपप्रादेशिक कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीस परिवहन उपायुक्त दिनकर मनवर यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत हिंगोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने केलेल्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. यावेळी नांदेड़ विभागाला अपघातमुक्त करण्यासाठी महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आल्या.
बैठकीत प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेषकुमार कामत यांनी विभागांच्या कामाचे पीपीटीद्वारे सादरीकरण केले. तसेच यापुढे जास्तीत-जास्त तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. एवढेच नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीने वाहनचालकांना चांगली सेवा देण्यासंदर्भात सूचित केले, अवैध प्रवासी वाहतूक, गौण खनिज, इंधन भेसळ आदी प्रतिबंधक मोहीम राबवून नियमित करवाई करण्याचे आवाहन केले.
आढावा बैठकीस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते, मोटार वाहन निरीक्षक वसंत कळंबकर, सुदेश कंदकुर्तीकर, जगदीश माने, शैलेशकुमार कोकुल्ला, नलिनी काळपांडे, आशिक तडवी व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.