२९ केंद्र असूनही लसीकरणाची गती संथच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:27 AM2021-03-14T04:27:00+5:302021-03-14T04:27:00+5:30
शासनाने सुरुवातीला ज्येष्ठ व गंभीर आजाराचे रुग्ण यांना लस देण्यामागे या वयोगटाला असलेला धोका आहे. मात्र, तरीही या वयोगटाला ...
शासनाने सुरुवातीला ज्येष्ठ व गंभीर आजाराचे रुग्ण यांना लस देण्यामागे या वयोगटाला असलेला धोका आहे. मात्र, तरीही या वयोगटाला लसीकरणासाठी आणले जात नसल्याने याबाबत पुन्हा जनजागृती करण्याची गरज असल्याचे दिसत आहे. कोरोनामध्ये सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण हे ज्येष्ठांचेच आहे. त्यातही गंभीर आजार असल्यास आणखी धोका वाढतो.
येथे होत आहे लसीकरण
परिचारिका वसतिगृह जिल्हा रुग्णालय, हिंगोली, उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, वसमत, ग्रामीण रुग्णालय औंढा, सेनगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र नर्सी नामदेव, फाळेगाव, सिरसम, भांडेगाव, पोत्रा, वाकोडी, मसोड, आखाडा बाळापूर, डोंगरकडा, रामेश्वर तांडा, शिरड शहापूर, जवळा बाजार, पिंपळदरी, लोहरा, कुरुंदा, हट्टा, हयातनगर, टेंभूर्णी, पांगरा शिंदे, गिरगाव, गोरेगाव, कवठा, साखरा, कापडसिंगी या २९ ठिकाणी शासकीय लसीकरण होत आहे. तर हिंगोलीत तीन खासगी लसीकरण केंद्र आहेत.
सीईओंनी दिला कारवाईचा इशारा
लसीकरणाची गती वाढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. शर्मा यांनीही सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. यात ४५ ते ६० वयाचे गंभीर आजारी व ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण वाढण्यासाठी सुमदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा व अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यास सांगितले आहे. तर या कामामध्ये कोणी दिरंगाई केली तर साथरोग कायद्यानुसार कारवाईचा इशाराही दिला आहे.
आज झालेले लसीकरण १७८९
४५ ते ६० वर्षांपर्यंतचे लसीकरण ३१२
६० वर्षांवरील लसीकरण १२५१
जिल्ह्यात आजपर्यंत झालेले लसीकरण १६८४९