पाणी असूनही विजेअभावी पिके करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:23 AM2018-10-27T00:23:37+5:302018-10-27T00:24:31+5:30
तालुक्यातील भांडेगाव परिसरात अनेक छोटेमोठे तलाव असून जमिनीचे क्षेत्र पाण्याखाली आहे. परंतु वीज राहत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक जाग्यावरच करपली. महावितरणच्या गलथान कारभाराला कंटाळून अखेर भांडेगाव येथील ग्रामस्थांनी थेट आ. तान्हाजी मुटकुळे यांची भेट घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील भांडेगाव परिसरात अनेक छोटेमोठे तलाव असून जमिनीचे क्षेत्र पाण्याखाली आहे. परंतु वीज राहत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक जाग्यावरच करपली. महावितरणच्या गलथान कारभाराला कंटाळून अखेर भांडेगाव येथील ग्रामस्थांनी थेट आ. तान्हाजी मुटकुळे यांची भेट घेतली.
मागील दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे अनेक शेतक-यांनी रात्रंदिवस एक करून पिके विहिर व बोअरचे पाणी देत आहेत. परंतु विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शेतकरी वैतागून गेले होते. महावितरणच्या संबधित अधिकारी व कर्मचा-यांना वीज समस्येबाबत वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे ग्रामस्थांनी थेट आ. तान्हाजी मुटकुळे यांची भेट घेतली. यावेळी आ. मुटकुळे यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता औरादे यांनी वीज समस्यां संदर्भात भेट घेतली. भांडेगाव परिसरातील विद्युत सुरळीत करण्याची मागणी केली. यावेळी ग्रामस्थांनी महावितरणच्या गलथान कारभारामुळेच शेतातील पिके करपल्याचे शेतकरी सांगितले. संबधित विद्युत कर्मचारी सुरळीत काम करीत नाही, त्यामुळे कर्मचाºयाची बदली करावी अशी मागणी यावेळी केली. भांडेगाव येथील उत्तमराव जगताप, परमेश्वर मांडगे, संतोष टेकाळे, ग्यानदेव जगताप, चक्रधर जगताप, रमेश जगताप, शंकर जगताप, लक्ष्मण जगताप, गजानन जगताप, तुकाराम जगताप, आनंदा जगताप, सिताराम जगताप, दत्तराव जगताप, विजय इंगोले यांच्यासह १०० च्यावर ग्रामस्थ हिंगोली येथे आले होते. शेतक-यांनी समस्यांचा पाढा वाचून दाखविल्यानंतर आ. मुटकुळे यांनी औरादे यांना धारेवर धरले. वीजपुरठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.