कयाधू पुनरुज्जीवनाचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:23 AM2018-03-23T00:23:56+5:302018-03-23T11:59:39+5:30
कयाधू नदी लोकसहभागातून पुनरुज्जीवित करण्यासाठी २१ मार्च रोजी झालेल्या बैठकीत डॉ.राजेंद्र सिंह राणा यांचा कार्यक्रम लोकसहभागातून घेण्याचा निर्धार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कयाधू नदी लोकसहभागातून पुनरुज्जीवित करण्यासाठी २१ मार्च रोजी झालेल्या बैठकीत डॉ.राजेंद्र सिंह राणा यांचा कार्यक्रम लोकसहभागातून घेण्याचा निर्धार करण्यात आला.
बुधवारी रात्री महावीर भवन येथे प्रकाश सोनी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी प्रास्ताविक केले. तर दि.३ एप्रिल मंगळवार रोजी मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ.राजेंद्र सिंह राणा हिंगोलीत उपस्थित राहून जिल्ह्यातील जनतेला मार्गदर्शन करून पुढील दिशा दर्शविणार आहेत, असे सांगितले. तर लोकचळवळ उभी राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीत संगीता चौधरी, आशिष वाजपेयी, डॉ.संजय नाकाडे, इम्तिआज खान, कांतप्रसाद गुंडेवार, नंदकिशोर तोष्णीवाल, जि.प.सदस्य डॉ.सतीश पाचपुते, संदेश देशमुख, प्रा. अनिल वाघ यांनीही मते मांडली. तर प्रकाशचंद सोनी यांनी या उपक्रमास भारतीय जैन संघटना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले
बैठकीत उपस्थितांनी राणा यांचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आर्थिक साह्य करण्याचे जाहीर केले. त्यामध्ये अभियंता संघटना, मिस्लीम मजलीश ए शूरा, आदिवासी युवक कल्याण संघ, कुलस्वामिनी महिला बँक, जैन संघटना, जिल्हा मराठी पत्रकार संघाने सहकार्य करण्याचे जाहीर केले. यावेळी जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.प्रेमेंद्र बोथरा यांनी केले. आभार अभय भरतीया यांनी मानले. यशस्वीतेस सुधाकर महाजन, प्रकाश इंगोले, आशिष पिंगळकर, कुलदीप मास्ट आदींसह कयाधू पुनरुज्जीवन समितीने परिश्रम घेतले.