भक्तीमय वातावरणात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:16 AM2019-01-03T00:16:35+5:302019-01-03T00:16:55+5:30
देशभरात आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी धर्म संप्रदायाचा प्रसार व प्रचार करणारे आद्य संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचे नवीन बांधकाम हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे सुरू आहे. मंदिरात २ जानेवारी रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंत्रोपचाराने भक्तीमय वातावरणात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नर्सी नामदेव : देशभरात आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी धर्म संप्रदायाचा प्रसार व प्रचार करणारे आद्य संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचे नवीन बांधकाम हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे सुरू आहे. मंदिरात २ जानेवारी रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंत्रोपचाराने भक्तीमय वातावरणात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
नर्सी येथे संत नामदेवांच्या जन्मठिकाणी कयाधू नदीच्या तिरावर मागील मागील अडीच वर्षांपासून संगमरवरी दगडाने भव्य असे मंदिर उभारण्यात आले आहे. २ जानेवारी रोजी बुधवारी सकाळी ९ वाजता श्री संत नामदेव महाराज यांच्या पुर्वीची जूनी मूर्ती व पूर्णाकृती नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी मंदिर जीर्णाेद्धार समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे, आ. तानाजी मुटकुळे, आ. संतोष टारफे, आ. रामराव वडकुते, माजी आ. गजानन घुगे, माजी आ. बळीराम कोटकर, माजी आ. दगडू गलंडे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, हभप लोकश चैतन्य महाराज, हभप काशिरामबुवा विडोळीकर, आत्मानंद महाराज गिरीकर, नारायण खेडकर, अॅड. के. के. शिंदे, माधवराव पवार, भानुदास जाधव, नगरसेवक गणेश बांगर, बाजीराव इंगोले, दाजीबा पाटील, सतीश विडोळकर, शाहूराव देशमुख, विठ्ठल वाशिमकर, गिरीश वरूडकर, विलास कानडे आदी उपस्थित होते.
बुधवारी सकाळी ९ वाजता श्रींच्या दोन्ही मूर्तींची पंचक्रोशीतील हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातारवणामध्ये दुग्धाभिषेक होमहवन व मंत्रोपचाराने, संत नामदेव महाराज यांच्या जयघोषाने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
यावेळी सकाळपासूनच नर्सीसह पंचक्रोशीतील हजारो भाविक मंदिर परिसरात एकत्र जमले होते. तर दुपारी बारा वाजता हभप श्री अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.