धानोरा प्रकरणी आला कारवाईला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:00 AM2018-04-18T01:00:07+5:302018-04-18T01:00:07+5:30
कळमनुरी तालुक्यातील धानोरा ज. येथील मजुरांनी बेरोजगार भत्ता देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आंदोलन सव्वा महिना उलटूनही अजून सुरूच आहे. आता जि.प. प्रशासनाने यात ग्रामरोजगार सेवकाला बडतर्फ करून इतरांवर कारवाई प्रस्तावित केली. मात्र आंदोलक अजूनही समाधानी नाहीत.
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील धानोरा ज. येथील मजुरांनी बेरोजगार भत्ता देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आंदोलन सव्वा महिना उलटूनही अजून सुरूच आहे. आता जि.प. प्रशासनाने यात ग्रामरोजगार सेवकाला बडतर्फ करून इतरांवर कारवाई प्रस्तावित केली. मात्र आंदोलक अजूनही समाधानी नाहीत.
मागील काही दिवसांपासून कळमनुरी तालुक्यातील धानोरा जहांगीर येथील मग्रारोहयोचे प्रकरण गाजत आहे. प्रशासन अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी कारवाई करीत नसल्याचा आरोप आंदोलक करीत आहेत. तर प्रशासन मात्र यात शक्य तेवढी कारवाई केल्याचे सांगून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करीत आहे. यातच महिना गेल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी जि.प. प्रशासनास खरमरीत पत्र दिले. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाईसाठी आंदोलकांशी जि.प. प्रशासनाने चर्चा केली. त्यानंतर कारवाईचे प्रस्ताव तयार होण्यास प्रारंभ झाला आहे. आजही जि.प.च्या प्रांगणात धानोरा येथील आंदोलक घुटमळताना दिसत होते. यात संबंधित दोषींवर कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी लक्ष्मण डुकरे व अॅड. विजय राऊत यांना दिले आहे.
याबाबत बोलताना प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एम. देशमुख म्हणाले, धानोरा येथील ग्रामरोजगार सेवकास काढून टाकण्यात आले आहे. तर या गावचा ग्रामसेवक कंत्राटी असून त्याची विभागीय चौकशी लावण्यात आली आहे. यात दोषी आढळल्यास ग्रामसेवकावर कारवाई होईल. तसेच कळमनुरीचा मग्रारोहयोच्या एपीओची कंत्राटी नेमणूक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झाल्याने त्याच्यावर संबंधित कार्यालयानेच कारवाई करावी, असा प्रस्ताव पाठविला आहे. गटविकास अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तर एका एमआयएसची रक्कम संबंधितांकडून वसूल करून मजुरांच्या खात्यावर टाकण्यास सांगितले.