जिल्हा कचेरीसमोर ‘ढोल बजाओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:15 AM2018-11-13T00:15:25+5:302018-11-13T00:15:36+5:30

मागील २ नोव्हेंबर पासून मुंबई येथील आझाद मैदानावर संभाजी पाटील व सहकाऱ्यांचे उपोषण सुरू आहे. मात्र उपोषणकर्त्यांची अद्याप सरकारने दखलही घेतली नाही. त्यामुळे उपोषणास पाठिंबा देत हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १२ नोव्हेंबर रोजी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

 'Dhol Bajo' in front of District Council | जिल्हा कचेरीसमोर ‘ढोल बजाओ’

जिल्हा कचेरीसमोर ‘ढोल बजाओ’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील २ नोव्हेंबर पासून मुंबई येथील आझाद मैदानावर संभाजी पाटील व सहकाऱ्यांचे उपोषण सुरू आहे. मात्र उपोषणकर्त्यांची अद्याप सरकारने दखलही घेतली नाही. त्यामुळे उपोषणास पाठिंबा देत हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १२ नोव्हेंबर रोजी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
शासनाने मराठा समाजाला वेळोवेळी आश्वासने दिली. परंतु एकही आश्वासन पाळले नाही. त्यामुळे आझाद मैदानावर उपोषण केले जात आहे. परंतु शासनाच्या एकाही प्रतिनिधीने उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही. विविध मागण्यांसाठी मुंबई येथे उपोषण केले जात आहे.

Web Title:  'Dhol Bajo' in front of District Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.