मरण झाले स्वस्त ; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातांमध्ये मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:19 AM2021-06-30T04:19:34+5:302021-06-30T04:19:34+5:30

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना संसर्ग आजारामुळे जवळपास ३८२ रुग्णांना जीव गमवावा लागला. रुग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे प्रशासन चिंतेत असताना त्यात ...

Died cheap; Corona in epidemic, then death in road accidents! | मरण झाले स्वस्त ; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातांमध्ये मृत्यू !

मरण झाले स्वस्त ; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातांमध्ये मृत्यू !

Next

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना संसर्ग आजारामुळे जवळपास ३८२ रुग्णांना जीव गमवावा लागला. रुग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे प्रशासन चिंतेत असताना त्यात रस्ते अपघाताने भर टाकली आहे. गतवर्षी रस्ते अपघातांमध्ये २३३ अपघात घडले असून, यात १२५ जणांना प्राण गमवावे लागले.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग आजाराने दुसऱ्या लाटेत चांगलाच धूमाकूळ घातला होता. आता कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असले, तरी कोरोनाने आतापर्यंत ३८२ रुग्णांचा जीव घेतला आहे, परंतु यापेक्षाही अधिक मृत्यू रस्ते अपघातांमध्ये होत आहेत. कोरोना काळात रस्ते अपघाताला थोडासा ब्रेक लागला. मात्र, आतापर्यंत रस्ते अपघातातील मृत्यूचा आकडा सर्वांना चिंतेत टाकणारा आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणे, भरधाव वाहने चालविणे, वाहनाला धोकादायकरीत्या ओव्हरटेक करणे, यातून अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यात रस्त्यांची दुरवस्थाही अपघातामध्ये भर टाकत आहे. रस्त्याची दुरवस्था असतानाही काही जण वेळेवर पोहोचण्यासाठी त्यावर भरधाव वाहने चालवितात. यातून अपघात घडतो. अपघातामध्ये दररोज मृत्यू होत असतानाही याचे काहीच वाटत नसल्याचे चित्र आहे.

वेळ मौल्यवान, पण जीवन अमूल्य!

वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात घडतात. माझाही अपघात झाला होता. या अपघातात पायात रॉड बसवावा लागला. अपघातातून बचावल्यानंतरच जीवन किती अमूल्य आहे ते कळते. त्यामुळे वाहने जपूनच चालवावी.

- गजानन कल्याणकर, बोरी शिकारी

वेळ ही महत्त्वाची आहे. वेळ सर्वांनीच पाळावी. मात्र, त्यापेक्षाही जीवन खूप महत्त्वाचे आहे. जीव सुरक्षित असेल, तर गमावलेली वस्तू पुन्हा मिळविता येते. वाहन चालविताना सर्वांनीच खबरदारी घ्यावी. माझाही अपघात झाला होता. यातून बचावलो.

- भगवान राऊत, साळवा

लॉकडाऊनमध्ये अपघात झाले कमी

देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते, तसेच या वर्षीही कडक निर्बंध घालण्यात आल्याने बहुतांश दिवस वाहने लॉक झाली होती. रस्त्यावर वाहनांची वर्दळ नसल्याने अपघाताला वाव मिळाला नाही. २०१९ मध्ये जिल्ह्यात २८९ अपघात घडले होते. यात १२३ जणांना जीव गमवावा लागला, तर २०२० मध्ये लॉकडाऊन काळात २३३ अपघातांच्या घटना घडल्या, तर १२५ जणांना जीव गमवावा लागला. २०२१ मध्येही अपघाताच्या घटनेत घट झाली आहे.

पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका

भरधाव वाहने चालवून, वाहनावरील नियंत्रण सुटून जशा अपघाताच्या घटना घडल्या. तशाच पायी जाणाऱ्या व्यक्तींनाही जीव गमवावा लागला. दुसऱ्यांच्या चुकीमुळे पायी जाणाऱ्या व्यक्तींला नाहक अपघाताला सामोरे जावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

गंभीर दुखापत झालेल्यांची संख्याही अधिक

जिल्ह्यात २०१९ मध्ये २८९ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात १२३ जणांचा मृत्यू झाला असून, २२६ जण गंभीर तर १०० जण किरकोळ जखमी झाले आहेत, तर २०२० मध्ये २३३ अपघात घडले. यात १२५ जणांचा मृत्यू झाला असून, १९५ जण गंभीर तर ३० जणांना किरकोळ मार लागला.

या ठिकाणी वाहने हळू चालवा

जिल्ह्यात १५ ब्लॅक स्पॉट आहेत. यात नांदेड नाका, रिसाला नाका, मसोड फाटा, पार्डीमोड फाटा, सावरखेडा ब्रीज फाटा, माळहिवरा पाटी, कलगाव वळण, अकोला बायपास, औंढा नागनाथ बसथांबा, गोळेगाव धाबा, धार पाटी, डोंगरकडा, वारंगा फाटा, कामठा फाटा, कौठा पाटी आदी ठिकाणांचा समावेश आहे. वाहन चालकांनी या ठिकाणी वाहने सावकाश चालवावीत.

वर्षे अपघात जखमी मृत्यू

२०१८ ३१३ ४४४ १३१

२०१९ २८९ ३२६ १२३

२०२० २३३ २२५ १२५

Web Title: Died cheap; Corona in epidemic, then death in road accidents!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.