सातबारावर येणार आता डिजिटल स्वाक्षरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:46 AM2018-04-30T00:46:26+5:302018-04-30T00:46:26+5:30

हिंगोली जिल्ह्यात आॅनलाईन सातबाराचे अद्ययावतीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे. वसमत शहर वगळता जिल्ह्यातील सर्व गावांचे सातबारा अद्ययावत झाले असून आता त्यावर तलाठ्याची डिजिटल स्वाक्षरीही येणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून क्षेत्रफळ जुळत नसलेल्या सातबारांची दुरुस्तीही सोबतच केली जात आहे.

 Digital Signature Now | सातबारावर येणार आता डिजिटल स्वाक्षरी

सातबारावर येणार आता डिजिटल स्वाक्षरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात आॅनलाईन सातबाराचे अद्ययावतीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे. वसमत शहर वगळता जिल्ह्यातील सर्व गावांचे सातबारा अद्ययावत झाले असून आता त्यावर तलाठ्याची डिजिटल स्वाक्षरीही येणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून क्षेत्रफळ जुळत नसलेल्या सातबारांची दुरुस्तीही सोबतच केली जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात महसुली गावांची संख्या ६९८ एवढी आहे. यात हिंगोली-१४९, सेनगाव-२८, कळमनुरी-१४८, औंढा १५१ अशा पूर्णच गावांचे सातबारा अद्यायावतीकरण झाले. मात्र वसमत तालुक्यातील १५१ पैकी केवळ वसमतचेच काम बाकी आहे. जिल्ह्यात सर्व सर्वे क्रमांकानुसार सातबारांची संख्या १ लाख ८0 हजार ६१0 एवढी आहे. यात हिंगोली-४00३0, औंढा ना-२७५५८, कळमनुरी-३६४३३, वसमत-३६४२६ व सेनगावात ४0१६३ एवढी सातबारांची संख्या आहे. या सर्व सातबारांवर आता त्या-त्या सज्जाच्या तलाठ्याची डिजिटल स्वाक्षरी येणार आहे. एकूण १७६ तलाठी सज्जे असून त्यापैकी जवळपास दहा पदे रिक्त आहेत. उर्वरित सज्जांना तलाठी असल्याने त्यांनी आता डिजिटल स्वाक्षरी सातबाराला जोडण्याचे काम सुरू केले आहे.या कामालाही लवकरच चांगली गती येणार आहे.
तलाठ्यांचा प्रातिनिधीक सत्कार
जिल्ह्यातील सर्वच तलाठ्यांनी सातबारा संगणकीकरणात मोलाची भूमिका बजावली. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यात काम न करणाऱ्या तलाठ्यांवर कारवाईचा बडगाही उगारला होता. त्यामुळे तलाठ्यांनी या कामाला गती दिली. त्याचा परिणाम म्हणून आता वसमत हे एकमेव शहर सातबारा संगणकीकरण न झालेले आहे. त्यामुळे उत्कृष्ट काम करणाºया तलाठ्यांना प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रातिनिधीक स्वरुपात १ मे रोजी प्रत्येक तालुक्यातील पाच तलाठ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
१ मे रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण होणार आहे. सातबारा संगणकीकरणाचा सत्कार कार्यक्रमही आहे. तर क्रीडा विभागाच्या पुरस्कारांत गुणवंत खेळाडू म्हणून शीतल सुरेश चव्हाण यांना प्रमाणपत्र व ५ हजारांचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक रामप्रकाश व्यवहारे व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता शिवाजी श्रावण इंगोले यांनाही स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व दहा हजारांचा धनादेश प्रदान होईल. जिल्हा युवा संस्था पुरस्कार सद्भाव सेवाभावी संस्थेचे अभय भारतिया यांना प्रदान केला जाणार आहे.
यंदाचा आदर्श तलाठी पुरस्कार औंढा नागनाथ तालुक्यातील माथा सज्जाचे व्ही.व्ही. मुंढे यांना १ मे रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. प्रमाणपत्र, पाच हजार रुपये असे त्याचे स्वरुप आहे.

Web Title:  Digital Signature Now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.