खा.सातव यांच्या निधनाबद्दल मान्यवरांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:28 AM2021-05-17T04:28:26+5:302021-05-17T04:28:26+5:30
-रामराव वडकुते, माजी आमदार काँग्रेसचे तरुण नेते खा.राजीव सातव यांचे अवघ्या ४६ वर्षी निधन झाले. त्यांनी आपल्या वीस वर्षांच्या ...
-रामराव वडकुते, माजी आमदार
काँग्रेसचे तरुण नेते खा.राजीव सातव यांचे अवघ्या ४६ वर्षी निधन झाले. त्यांनी आपल्या वीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत देश पातळीवर छाप पाडली. त्यांच्या या कार्यामुळे राहुल गांधीच्या जवळ गेले. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
-भाऊराव पाटील गोरेगाव, माजी आमदार
राष्ट्रीय पातळीवर काम करतानाही मराठवाडा, हिंगोलीचा विचार करणारा, सर्वसामान्यांविषयी आस्था असणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला. ही कधीही भरून निघणारी हानी झाली.
-बाबाराव बांगर, नगराध्यक्ष
हिगोलीचे सुपुत्र राजीव सातव यांनी देशाच्या राजकारणात आपला ठसा उमटविला होता. असा नेता आता पुन्हा होणे नाही. विकासप्रिय नेतृत्व हरवले. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दुखातून सावण्याची शक्ती देवो.
-दिलीप चव्हाण, उपनगराध्यक्ष
राष्ट्रीय राजकारणात छाप पाडणारा अभ्यासू, संयमी व मितभाषी नेता आल्यातून निघून गेला. जिल्ह्याची व राज्याची मोठी हानी झाली.
-बंडू कुटे, जिल्हाध्यक्ष, मनसे
खासदार राजीव आता आपल्यात नाहीत, या घटनेवर माझ्या मनाचा विश्वासच बसत नाही. . एक सभ्य,सुसंस्कृत, सुस्वभावी, द्वेष रहित आणि माणुसकी जपणारे हे उमदे व्यक्तिमत्व इतक्या तरुण वयात निघून गेले ही घटना मनाला कासावीस करणारी आहे. त्यांनी छोट्याशा वयात आपल्या गुणसंपन्न कर्तृत्वाने केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या अपेक्षा वाढवल्या होत्या. राजीव सातव म्हणजे एक सदैव संस्मरणीय व्यक्तिमत्व .
-आ. ह. साळुंखे, ज्येष्ठ विचारवंत
केंद्रीय राजकारणात महाराष्ट्राचा दबदबा असणारे व एक सुसंस्कृत असे नेतृत्व खासदार अॅड. राजीव सातव यांच्या निधनाने मराठवाड्याचे नव्हे, तर महाराष्ट्राचे मोठे राजकीय व सामाजिक नुकसान झालेले आहे.
- संजय टाकळगव्हाणकर, हिंगोली
देशपातळीवर काम करणारे नेतृत्व काळाने हिरावले. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्याची, राज्याची अपरिमित हानी झाली आहे.
-निश्चल यंबल,
खा.राजीव सातव हे फुले, शाहू, आंबेकडकरांच्या विचाराचे पाईक व राष्ट्रीय पातळीवर काम करणारे नेते होते. कार्यकर्त्यांशी आत्मियतेने वागणारा नेता काळाने हिरवला.
-दिवाकर माने, रिपाइं