आपत्ती व्यवस्थापन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 11:56 PM2018-10-05T23:56:34+5:302018-10-05T23:56:50+5:30
१३ आॅक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघांनी घोषित केल्यानुसार प्रतिवर्षी जागतिक आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभर हा दिवस आपत्ती धोके निवारणाविषयी जनजागृती करून व यासंबंधी निरनिराळे उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने हा दिवस जिल्हास्तरावर आपत्ती धोके निवारण उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात विविध कार्यक्रमासोबतच आपत्ती व्यवस्थापन देखावा स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : १३ आॅक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघांनी घोषित केल्यानुसार प्रतिवर्षी जागतिक आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभर हा दिवस आपत्ती धोके निवारणाविषयी जनजागृती करून व यासंबंधी निरनिराळे उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने हा दिवस जिल्हास्तरावर आपत्ती धोके निवारण उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात विविध कार्यक्रमासोबतच आपत्ती व्यवस्थापन देखावा स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षक ६ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता दूरध्वनी क्र.९४०५४०८९३९ वर संपर्क साधून अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट देऊन नावनोंदणी करू शकतात. प्रथम नावनोंदणी करणाऱ्या ४० शाळांची स्पधेर्साठी निवड करण्यात येणार आहे.
परीक्षकांच्या समिती मार्फत निवड झालेल्या विजेत्या ३ शाळांना १३ आॅक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह तसेच प्रथम येणाºया शाळेस १० हजार रूपये द्वितीय ७ हजार रूपये तर तृतीय ५ हजार रूपये याप्रमाणे बक्षिस वितरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सहभागी होण्याचे आवाहन केले.
शाळांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
देखावा स्पधेर्चे आयोजन स्पर्धेसाठी माध्यमिक शाळा नावनोंदणी करू शकतील. (गट १ शिक्षक व ५ विद्यार्थी) विषय-गाव जल व्यवस्थापन. (पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, सांडपाण्याचे व्यवस्थापन इत्यादी), घरगुती जल व्यवस्थापन पावसाच्या पाण्याचे, सांडपाण्याचे व्यवस्थापन), भूकंप आपत्ती व्यवस्थापन, (पूर्वतयारी, भूकंपरोधक घर,जनजागृती),पुर आपत्ती व्यवस्थापन. (पूर्वतयारी, जनजागृती, उपलब्ध साधनांचा वापर करून जिवितहानी टाळणे ई.), रस्ता अपघात व्यवस्थापन-(पूर्वतयारी, जनजागृती, उपाययोजना), वीज आपत्ती व्यवस्थापन. (पूर्वतयारी, जनजागृती, उपाययोजना), आगव्यवस्थापन. (पूर्वतयारी घरातील व गावातील तसेच कारखान्यातील आगीचे व्यवस्थापन व उपाययोजना इत्यादी.