३४ हजार ९४४ क्युसेसने पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:34 AM2021-09-24T04:34:57+5:302021-09-24T04:34:57+5:30

हिंगोली: येलदरी धरणातील पाणी व धरणाच्या वरील ११ गावांत पडलेल्या पावसामुळे सिद्धेश्वर धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे गुरुवारी ...

Discharge of water by 34 thousand 944 cusecs | ३४ हजार ९४४ क्युसेसने पाण्याचा विसर्ग

३४ हजार ९४४ क्युसेसने पाण्याचा विसर्ग

Next

हिंगोली: येलदरी धरणातील पाणी व धरणाच्या वरील ११ गावांत पडलेल्या पावसामुळे सिद्धेश्वर धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे गुरुवारी ३ वाजेच्या सुमारास धरणाचे बाराही दरवाजे ४ फुटांनी उघडले आहेत. ३४ हजार ९४४ क्युसेसने २३ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान धरणातील पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात करण्यात आला.

२० सप्टेंबरपासून सिद्धेश्वर धरणाच्या वरती असलेलेल्या ११ गावांमध्ये पाऊस चांगलाच पडत आहे. पहिल्या दिवशी ६ दरवाजे २ फुटाने तर ६ दरवाजे ३ फुटाने उघडले होते. दुसऱ्या दिवशी १२ दरवाजे ३ फुटाने तर आज तिसऱ्या दिवशी १२ दरवाजे ४ फुटाने उघडले आहेत. सद्य:स्थितीत धरणातील पाणीसाठा २५६.८०४ दलघमी असून जिवंत पाणीसाठा ८०.९६ दलघमी एवढा आहे. मागच्या तीन दिवसांपासून चिंचखेडा, हिवरखेडा, घडोळी, आमदरी, लिंबाळा, कोल्डेगाव, तांदूळवाडी, बोडका, ब्राह्मणवाडी, डिग्रस आदी ११ गावांमध्ये पावसाचे प्रमाण चांगले झाल्याने सिद्धेश्वर धरणात पाण्याचा येवा वाढला आहे.

चार फुटांनी उघडले बाराही दरवाजे

पाण्याचा येवा धरणात जास्त झाल्यामुळे धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पूर्णा नदीखालील २२ गावांना तिसऱ्या दिवशीही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील पाण्याचा येवा लक्षात घेता पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

-भूषण कनोज, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे विभाग

Web Title: Discharge of water by 34 thousand 944 cusecs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.