पुन्हा एकदा हंगामी वसतिगृहांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:41 IST2018-08-28T00:41:27+5:302018-08-28T00:41:43+5:30
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीत पुन्हा एकदा हंगामी वसतिगृहाच्या देयकांवरच चर्चा रंगली. चौकशीशिवाय देयके अदा करू नयेत, असा ठराव घेण्यात आला आहे.

पुन्हा एकदा हंगामी वसतिगृहांवर चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीत पुन्हा एकदा हंगामी वसतिगृहाच्या देयकांवरच चर्चा रंगली. चौकशीशिवाय देयके अदा करू नयेत, असा ठराव घेण्यात आला आहे.
सभापती संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी जि.प.सदस्य विठ्ठल चौतमल यांनी हंगामी वसतिगृहाच्या देयकांचा मुद्दा उपस्थित केला. ही देयके अदा करा. मात्र त्यासाठी आधी पर्यवेक्षकीय यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. तसा ठरावही समितीत घेण्यात आला. या बैठकीत मागील इतिवृत्तावर चर्चा झाली. मात्र यात मागील काही विषयांवरून आजही थोडीबहुत कुरबूर असल्याचे चित्र पहायला मिळाले.
यावेळी प्रभारी शिक्षणाधिकारी गणेश शिंदे, जि.प.सदस्या संगीता शिंदे, रत्नमाला चव्हाण, भगवान खंदारे, विनायक वाघमारे आदी सदस्यांची उपस्थिती होती.