कळमनुरी येथे आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 11:40 PM2017-12-03T23:40:26+5:302017-12-03T23:40:33+5:30
हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर असलेल्या आ.डॉ. संतोष टारफे यांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड ४ ते ५ जणांनी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.४५ वाजता केल्याची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर असलेल्या आ.डॉ. संतोष टारफे यांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड ४ ते ५ जणांनी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.४५ वाजता केल्याची घटना घडली.
गणेश पांडुरंग गिरी यांच्या फिर्यादीवरून बालाजी वानखेडे (पूर ता.औंढा) व इतर ४ जणाविरूद्ध कलम १४३, १४७, ४५२, ४२७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात लाकडे, दंडुके घेवून अनाधिकृत रित्या आमदार संपर्क कार्यालयात घुसून फिर्यादीस धक्काबुक्की व शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
संपर्क कार्यालयाची तोडफोड करून ८० हजार रुपयांचे नुकसान केले. घटनेचा पुढील तपास फौजदार एस.एस.घेवारे हे करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर भोरे यांनी पोलीस ठाण्यात येवून घटनेची माहिती घेतली.