जि. प.कडे पेन्शन प्रस्ताव पाठवण्यास मुख्याध्यापकांची दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:54+5:302021-07-19T04:19:54+5:30
भविष्यात शिक्षक, कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी त्रास होऊ नये म्हणून शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन शिक्षकांच्या सेवापुस्तिका ...
भविष्यात शिक्षक, कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी त्रास होऊ नये म्हणून शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन शिक्षकांच्या सेवापुस्तिका अद्ययावत कराव्यात, त्यामध्ये नामनिर्देशन प्रमाणपत्राची नोंद करण्यात यावी, सर्व नोंदी असल्याशिवाय संबंधित शिक्षक, कर्मचाऱ्यांची जुलै २०२१ मध्ये वार्षिक वेतनवाढ मान्य करण्यात येऊ नये, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना सूचना दिल्या होत्या. मात्र, अनेक मुख्याध्यापक हे शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या मूळ सेवापुस्तिका व द्वितीय सेवापुस्तिका अद्ययावत करण्याकडे टाळाटाळ करत आहेत, तसेच कुटुंबीयांच्या फॅमिली पेन्शनचा प्रस्ताव जि. प. कडे पाठविला जात नसल्याने मयत शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रस्ताव दाखल करण्यासाठी पायपीट करावी लागत आहेत. या प्रकाराने कुटुंबीय त्रस्त झाले असून त्या कुटुंबातील सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.