२०० दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:40 AM2018-12-10T00:40:44+5:302018-12-10T00:41:03+5:30
लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथील साथ फाऊंडेशन व स्थानिक दात्यांच्या पुढाकारातून हिंगोली जिल्ह्यातील २०० दिव्यांगांना साहित्याचे वाटप व दिव्यांग भूषण पुरस्कार वितरण सोहळा रविवारी महाविरभवन येथे पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथील साथ फाऊंडेशन व स्थानिक दात्यांच्या पुढाकारातून हिंगोली जिल्ह्यातील २०० दिव्यांगांना साहित्याचे वाटप व दिव्यांग भूषण पुरस्कार वितरण सोहळा रविवारी महाविरभवन येथे पार पडला.
साथ फाऊंडेशनच्या वतीने यंदा प्रथमच दिव्यांग भूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पाच व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, डॉ. मनोज साबू , शंकर बाचेवार, दशरथ मुंढे, भुजंग फुलझळके आदींचा समावेश आहे. ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महावीर भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसह महिला, पुरूषांना ब्लॅकेंट, स्वेटर, कपडे, शालेय साहित्यांचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर कार्यक्रमास साथ फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराज कदम, सचिव मीरा कदम, गोविंद गिरी, सुभाष जिरवणकर, अनिल दवणे, शिवाजी कºहाळे, प्रा.निरगुडे, भारत कावरखे, प्रा.भागवत सावंत, गजानन झाडे, हनुमान जगताप आदींची उपस्थिती होती.