११८ बचतगटांना १७ लाख ७० हजार निधीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:33 AM2021-08-13T04:33:37+5:302021-08-13T04:33:37+5:30

हा कार्यक्रम १२ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता घेण्यात आला. कार्यक्रमास जि. प. अध्यक्ष गणाजी बेले, उपाध्यक्ष मनिष आखरे, ...

Distribution of 17 lakh 70 thousand funds to 118 self help groups | ११८ बचतगटांना १७ लाख ७० हजार निधीचे वाटप

११८ बचतगटांना १७ लाख ७० हजार निधीचे वाटप

Next

हा कार्यक्रम १२ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता घेण्यात आला. कार्यक्रमास जि. प. अध्यक्ष गणाजी बेले, उपाध्यक्ष मनिष आखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, प्रकल्प संचालक धनवंतकुमार माळी, जिल्हा अभियान व्यवस्थापक जयराम मोडके, जिल्हा व्यवस्थापक विक्रम सारस्वत, किरण गुरमे, राजू दांडगे, मनोज पिंनगाळे आणि जिल्ह्यातील बचतगटांच्या महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत घेऊन करण्यात आली. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसोबत केलेला सुसंवाद सर्वांना ऐकविण्यात आला.

जिल्ह्यामध्ये प्रत्येक पंचायत समिती स्तरावर प्रभाग संघाच्या, ग्राम संघाच्या कार्यालयात तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये बचतगटांच्या ७० हजार ५९५ महिलांनी येऊन कोरोना महामारीच्या सर्व नियमांचे पालन करून ऐकला. या वेळी १०९ गटांना १६ लक्ष ३५ हजार फिरत्या निधीचे वाटप करण्यात आले. आज हिंगोली जिल्हा फिरत्या निधी वाटपात प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले.

फोटो ७

Web Title: Distribution of 17 lakh 70 thousand funds to 118 self help groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.