जि.प.त ३४२ विहिरींसाठी होणार सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:31 AM2018-11-15T00:31:14+5:302018-11-15T00:31:37+5:30
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत ३४२ विहिरींचे वाटप होणार आहे. यासाठी १५ नोव्हेंबर रोजी जि.प.च्या सभागृहात सोडत होणार आहे, अशी माहिती जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एम. देशमुख यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत ३४२ विहिरींचे वाटप होणार आहे. यासाठी १५ नोव्हेंबर रोजी जि.प.च्या सभागृहात सोडत होणार आहे, अशी माहिती जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एम. देशमुख यांनी दिली.
विशेष घटकमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना लाभ देता येतो. यात विहिरीसाठी २.९0 लाखांचे अनुदान देता येते. तर इतर साहित्यासह ३.४0 लाखांपर्यंतच्या लाभाची तरतूद आहे. तर जुन्या विहिरी दुरुस्तीसाठी एक लाखापर्यंतचा निधी देता येतो. याशिवाय इतर बाब या सदरात साहित्य खरेदीसाठी ५0 हजारांपर्यंतच्या निधीची तरतूद करणे शक्य आहे. अशाच प्रकारच्या अटी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतही आहेत. यामध्ये स्वावलंबनसाठी यंदा १0.१७ कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद आहे. यातील ८५ टक्के म्हणजे ८.६४ कोटी रुपयांचा निधी नवीन विहिरींना देता येणार आहे. यात २८९ लाभार्थी निवडणे शक्य आहे. तर १0 टक्के निधी जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी ठेवला जाणार असून १ कोटी एक लाखात ९७ लाभार्थ्यांना लाभ देणे शक्य आहे. तर इतर बाबसाठी ५0 लाख उरणार असून यामध्ये ५0 जणांना लाभ देणे शक्य आहे.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत १.८0 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. यात नवीन विहिरीसाठी ८५ टक्क्यांप्रमाणे १.५३ कोटी मिळणार असून ५३ लाभार्थी देणे शक्य आहे. १0 टक्के जुनी विहिरी दुरुस्तीसाठी असून यात १९ लाभार्थ्यांना लाभ मिळणे शक्य आहे. तर इतर बाब म्हणून साहित्य खरेदीसाठी ठेवलेल्या ५ टक्के निधीत ९ लाखांमध्ये १९ लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे.
नवीन विहिरींसाठी डॉ.आंबेडकर कृषी स्वावलंबनमध्ये औंढा ६५, वसमत-७८, हिंगोली-६६, कळमनुरीगल९ तर सेनगाव तालुक्यात ४१ लाभार्थ्यांची निवड होणार आहे. तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत नवीन विहिरींचे औंढा-२४, वसमत-६, हिंगोली-४, कळमनुरी-१५ व सेनगावात ४ लाभार्थी निवडले जाणार आहेत. या सोडतीसाठी जिल्हा परिषदेत जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र पहायला मिळाले.