महा-आवास अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्काराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:35 AM2021-08-17T04:35:00+5:302021-08-17T04:35:00+5:30

२० नोव्हेंबर २०२०पासून ५ जून २०२१ या कालावधीत महा आवास अभियान ग्रामीण राबविण्यात आले होते. सर्वांसाठी घरे २०२२ ...

Distribution of district level awards under Maha-Awas Abhiyan by the Guardian Minister | महा-आवास अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्काराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

महा-आवास अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्काराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

googlenewsNext

२० नोव्हेंबर २०२०पासून ५ जून २०२१ या कालावधीत महा आवास अभियान ग्रामीण राबविण्यात आले होते. सर्वांसाठी घरे २०२२ या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, कामास गतिमान करणे व गुणवत्ता आणणे हा अभियानाचा उद्देश होता. भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, मंजुरी देणे, पहिल्या हप्त्याचे वितरण करणे, १०० टक्के भौतिकदृष्ट्या घरकुल पूर्ण करणे, अशा विविध निकषांवरती गुणांकन करण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत उत्कृष्ट तालुका, उत्कृष्ट क्लस्टर, उत्कृष्ट ग्रामपंचायत, उत्कृष्ट वित्तीय संस्था असे विविध पारितोषिके प्रदान करण्यात आले.

सर्वोत्कृष्ट क्लस्टर प्रथम-टेंभुर्णी, द्वितीय-गिरगाव, तृतीय-हयातगर (तालुका वसमत), उत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम-नरवाडी, द्वितीय-मसोड, तृतीय-शेनोडी (तालुका कळमनुरी), वित्तीय संस्था प्रथम-महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा औंढा नागनाथ, द्वितीय-स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जवळाबाजार,

राज्य पुरस्कृत आवास योजनाअंतर्गत सर्वोत्कृष्ट तालुके प्रथम-औंढा नागनाथ, द्वितीय-वसमत, तृतीय-हिंगोली सर्वोत्कृष्ट क्लस्टर प्रथम-पांगरा शिंदे, द्वितीय-येहळेगाव, तृतीय-खेर्डा, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम-पार्डी, द्वितीय- कुंभारवाडी, तृतीय-जामगव्हाण.

कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, सहा. प्रकल्प संचालक गणेश बोथीकर, जिल्हा प्रोग्रामर गणेश पाटील, मनोज पिनगाळे, सचिन इंगोले, संतोष काळे, महेश अकमार, अरुण बोधनकर, एस. एम. शेख, खंदारे, भाले उपस्थित होते. सूत्रसंचालन जे. व्ही. मोडके यांनी केले.

Web Title: Distribution of district level awards under Maha-Awas Abhiyan by the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.