जंतनाशक गोळ्या वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:18 AM2018-08-11T00:18:12+5:302018-08-11T00:18:27+5:30
जिल्ह्यात जंतनाशक गोळ्यांच्या वाटपाची मोहीम आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास दीड लाखांवर गोळ्यांचे वाटप केल्याची प्राथमिक माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात जंतनाशक गोळ्यांच्या वाटपाची मोहीम आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास दीड लाखांवर गोळ्यांचे वाटप केल्याची प्राथमिक माहिती आहे.
या योजनेत ग्रामीण भागात ९९४ शाळांत २.४८६ लाख विद्यार्थी तर १0४८ अंगणवाड्यांमध्ये ८८ हजार ८९८ विद्यार्थी आहेत. याशिवाय शाळाबाह्य ४५८३ मुले गृहित धरली आहेत. तर शहरी भागातील १५३ शाळांमध्ये ६१ हजार८६८, १३३ अंगणवाड्यांमध्ये २0 हजार ८७५ व शाळाबाह्य १६८८ मुले गृहित धरली आहेत. यामध्ये ग्रामीण भागासाठी ३.३२ लाख तर शहरी भागासाठी ८२ हजार ५२३ गोळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
या अभियानास आज जिल्हाभर प्रारंभ झाला आहे. हिंगोलीत माणिक स्मारक शाळेत आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले.
यावेळी सीईओ एच.पी. तुम्मोड, जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.श्रीवास, डीएचओ डॉ.शिवाजी पवार, डॉ.गोपाल कदम, डॉ.सतीश रुणवाल, तुपकरी आदींची उपस्थिती होती. जिल्हाभरात आज दीड लाखांच्यावर गोळ्यांचे वाटप झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उर्वरित बालकांना १६ आॅगस्टला गोळ्या वाटप होतील.