लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:35 AM2021-08-18T04:35:33+5:302021-08-18T04:35:33+5:30
कोरोना काळात बहुतेक जणांचे व्यवसाय, रोजगार ठप्प पडला आहे. त्यामुळे संसाराचा गाडा चालविताना मोठी कसरत करावी लागते. त्यात अद्यापही ...
कोरोना काळात बहुतेक जणांचे व्यवसाय, रोजगार ठप्प पडला आहे. त्यामुळे संसाराचा गाडा चालविताना मोठी कसरत करावी लागते. त्यात अद्यापही शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके मिळाली नाहीत. शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालकांकडे पैशांची चणचण भासत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता कळमनुरी तालुक्यातील भूतनर सावंगी येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य विकत घेऊन देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लोकवर्गणी जमा करण्यात आली. जमा झालेल्या लोकवर्गणीतून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रा. भगवान मस्के, प्रशांत पाईकराव, शिवाजी अंभोरे, दत्तराव ढोणे, अनिल भूतनर, आकाश काळे, अमोल भूतनर, तुकाराम भूतनर, शंकर भूतनर, देवराव भूतनर, राज बाभूळकर, गौतम गायकवाड, संदीप भूतनर, पांडुरंग भूतनर, दीपक चोरमले, शेख अजर आदींची उपस्थिती होती. दरम्यान, याच वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी दत्तराव ढोणे, रावसाहेब भूतनर, सुभाष ढोणे, शेख गफार, प्रदीप भूतनर, केशव काष्टे, शिवाजी भूतनर, संदीप भूतनर, शिवाजी भूतनर, दत्तराव अंभोरे, बाळू अंभोरे, सुनील साळवे, बाळू भोसकर, यशवंत भूतनर, तुकाराम भूतनर, गजानन भूतनर, ज्ञानेश्वर नीळकांठे, मसाराव भूतनर, अरविंद साळवे उपस्थित होते.
फोटो :