हिंगोली जिल्ह्यात आढळले २२९३ संशयित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:38 PM2019-09-26T23:38:16+5:302019-09-26T23:39:05+5:30

जिल्ह्यात संयुक्त कृष्ठरोग, क्षयरोग व असांसर्गिक आजार रुग्ण शोध व जनजागृती अभियान १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे.

 In the district, 194 suspected patients were found | हिंगोली जिल्ह्यात आढळले २२९३ संशयित रुग्ण

हिंगोली जिल्ह्यात आढळले २२९३ संशयित रुग्ण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात संयुक्त कृष्ठरोग, क्षयरोग व असांसर्गिक आजार रुग्ण शोध व जनजागृती अभियान १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जनजागृती अभियानात संशयित २२९३ रुग्ण पथकाला आढळून आले. त्यापैकी १९३७ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात ३ एमबी व १३ पीबी असे रुग्ण दिसून आले आहेत. तसेच या मोहिमेदरम्यान नव्याने ३९ क्षयरोग रुग्ण निघाले असून त्यांना औषधोपचाराखाली आणले आहे.
यामध्ये जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या १०९९४७६ असून घरे २१११७२ आहेत. आरोग्य विभागाच्या ११९५ शोध पथकाद्वारे ग्रामीण व शहरी भागात सर्वेक्षण करण्यात येत आहे. मोहीमेत घरोघरी जाऊन स्वयंसेवकांकडून तपासणी करून घेतली जात आहे.
१३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या मोहिमे संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अभियान प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात सक्त सूचनाही दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जनजागृती केली जात आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबविला जात आहे. कुष्ठरोग, क्षयरोग, असंसर्गिक रोग निदान व औषधोपचाराची सुविधा मोफत उपलब्ध आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार हे सुद्धा जिल्हाभरात फिरून अभियानाचा आढावा घेत आहेत.तसेच संबंधितांना अभियान जनजागृतीबाबत मार्गदर्शन करीत आहेत.

Web Title:  In the district, 194 suspected patients were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.