जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला वाळूघाटांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:49 AM2018-10-24T00:49:05+5:302018-10-24T00:49:18+5:30
तालुक्यातील विविध समस्या तसेच महसूलच्या विविध विभागाच्या प्रगतीचा आढावा मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून जिल्ह्याधिकारी अनिल भांडरी यांनी घेतला. एवढेच नव्हे, तर त्यांनी काही वाळू घाटांची गोपनीय तपासणी केली परंतु या ठिकाणी त्यांना काही आढळून आले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
औढा नागनाथ : तालुक्यातील विविध समस्या तसेच महसूलच्या विविध विभागाच्या प्रगतीचा आढावा मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून जिल्ह्याधिकारी अनिल भांडरी यांनी घेतला. एवढेच नव्हे, तर त्यांनी काही वाळू घाटांची गोपनीय तपासणी केली परंतु या ठिकाणी त्यांना काही आढळून आले नाही.
औंढा नागनाथ येथे मंगळवारी ११ वाजता जिल्हाधिकारी अनिल भांडरी, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मणियार, उपजिल्धिकारी प्रवीण फुलारी यांनी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना मळलेल्या गुप्त माहितीनुसार तालुक्यातील पूर येथून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक पाठविण्यात आले होते. यावेळी त्यांना त्या ठिकाणी काहीच मिळाले नाही. या तालुक्यात आजपर्यंत ५० च्या वर वाहनांवर तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी व त्यांच्या पथकाने कारवाई केली. ५० लाखांपेक्षा जास्त रक्कम ही यापोटीच्या दंडातून मिळाली आहे. हा महसूल घाट लिलावाच्या तुलनेत जास्तच आहे. तरीही जिल्हाधिकाºयांनी मिळालेल्या महितीनुसार कारवाई केली. आढावा बैठकीत रेशन कार्ड, नवीन निवडणूक मतदार नोंदणी, महसूल, दस्तावेज अद्यवत करणे आदी विषयांवर आढावा घेतला औंढा तहसीलच्या कामगिरीचे जिल्हाधिकाºयांनी कौतुक केले.
दंड वसूल
हिंगोली - अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर पोलिसांनी २३ आॅक्टोबर रोजी कारवाई केली. ५३ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करून १९ हजार ६०० रूपये दंड वसूल केला. विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी कारवाई करण्यात आली. यावेळी अनेकांची वाहनेही जप्त करण्यात आली होती.