जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ५८ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:20 AM2021-07-21T04:20:56+5:302021-07-21T04:20:56+5:30

जिल्ह्यात पेरणीनंतर पावसाने पाठ फिरविली होती. मात्र, पुन्हा पावसाच्या सरी कोसळत आहेत. ठिकाण बदलून पाऊस होत असला तरी या ...

The district has received 58% of the average rainfall so far | जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ५८ टक्के पाऊस

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ५८ टक्के पाऊस

Next

जिल्ह्यात पेरणीनंतर पावसाने पाठ फिरविली होती. मात्र, पुन्हा पावसाच्या सरी कोसळत आहेत. ठिकाण बदलून पाऊस होत असला तरी या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसाही पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शहरात सखल भागात पाणी साचले होते. सोमवारपर्यंत मागच्या २४ तासात जिल्ह्यात ९.४० मिमी. पावसाची नोंद झाली असून, यात हिंगोली तालुक्यात ४.००, कळमनुरी ३.८०, वसमत ०.५०, औंढा नागनाथ १७.७०, सेनगाव तालुक्यात सर्वात जास्त २६.२० मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अद्याप एकही मोठा पाऊस झाला नाही. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे कयाधू नदी दुथडी भरून वाहिली होती. त्यानंतर मात्र अद्याप नदीला एकही मोठा पूर आला नाही. जिल्ह्यातील तलाव, बंधारे अजूनही तहानलेलीच असल्याचे चित्र आहे.

गतवर्षी झाला होता १२०.४८ टक्के पाऊस

जिल्ह्यात गतवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत ९५८.२० मिलिमीटर पाऊस झाला होता. याची टक्केवारी १२०.४८ एवढी झाली होती. यावर्षी अधून-मधून पाऊस होत असला तरी आतापर्यंत ४६५.१० मिमी पाऊस झाला आहे. मान्सून कालावधी संपण्यासाठी आणखी दोन महिने बाकी आहेत. या दोन महिन्यात जोरदार पाऊस झाला तर वार्षिक सरासरी गाठली जाईल. सध्या पावसाची शक्यता लक्षात घेता आगामी काळात हा पाऊस होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

आतापर्यंत झालेला पाऊस (मान्सून कालावधी)

तालुका सर्वसाधारण पाऊस एकूण झालेला पाऊस टक्केवारी

हिंगोली ८६७.९० ४५१.६० ५२.०३

कळमनुरी ७९५.४० ४८०.१० ६०.३६

वसमत ८२४.०० ४५२.३० ५४.८९

औंढा ७३६.१० ५४०.७० ७३.४५

सेनगाव ७२९.७० ४३१.२० ५९.०९

एकूण ७९५.३० ४६५.१० ५८.४८

Web Title: The district has received 58% of the average rainfall so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.