जिल्ह्यात लसीकरण मोहीम उद्दिष्टपूर्तीच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:18 AM2018-12-23T01:18:48+5:302018-12-23T01:19:06+5:30
जिल्ह्यात गोवर-रूबेला लसीकरण मोहीम राबविली जात आहे. ९ महिने ते १५ वयोगटातील बालकांना आरोग्य विभागातर्फे लस दिली जात असून सदर मोहीमेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. ३ लाख १८ हजार २३० पैकी आतापर्यंत २ लाख ३६ हजार ३४० बालकांना लस देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात गोवर-रूबेला लसीकरण मोहीम राबविली जात आहे. ९ महिने ते १५ वयोगटातील बालकांना आरोग्य विभागातर्फे लस दिली जात असून सदर मोहीमेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. ३ लाख १८ हजार २३० पैकी आतापर्यंत २ लाख ३६ हजार ३४० बालकांना लस देण्यात आली आहे.
गोवर-रूबेला लसीकरण करुन घेण्यापूर्वी मुलांना जेवायला देणे आवश्यक आहे. तसेच मुलांना लसीकरणाची भीती वाटत असेल तर त्यांना भीती न बाळगण्याबाबतचा आत्मविश्वास द्यावा. तीव्र ताप असल्यास किंवा गंभीर आजारी असल्यास लस देऊ नये. गोवर रुबेला लसीकरणहमुळे जर लालसर पुरळ किंवा खाज येणे अशी लक्षणे दिसल्यास घाबरुक जाण्याचे कारण नाही. एमआरची लस ही सुरक्षित आहे. त्यामुळे बालकांना लस देण्याचे आवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, जिल्हा आरोग्याधिकारी शिवाजी पवार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतिश रुणवाल, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी, आदींनी केले.
माणिकस्मारक विद्यालयात लसीकरण - शहरातील माणिकस्मारक विद्यालयातील १ हजार ६०३ विद्यार्थ्यांना गोवर-रुबेला लसी देण्यात आली. या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत १० चमूंनी २ सत्रात नियोजन करण्यात आले. लस दिलेल्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे अध्यक्ष ओमप्रकाश भारुका यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.