महाआवास त्रैमासिकाचे जिल्हास्तरीय विमोचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:20 AM2021-06-29T04:20:35+5:302021-06-29T04:20:35+5:30
जानेवारी ते मार्च २०२१ या त्रैमासिकातील अहवालानुसार हिंगोली जिल्हा विभागात प्रथम क्रमांकावर आहे. अहवालानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ...
जानेवारी ते मार्च २०२१ या त्रैमासिकातील अहवालानुसार हिंगोली जिल्हा विभागात प्रथम क्रमांकावर आहे. अहवालानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण २०१६-२०१७ ते २०२०-२०२१ या कालावधीमध्ये हिंगोली जिल्ह्याचे उद्दिष्ट ११ हजार ७७ असून त्यापैकी ६ हजार ७११ घरकुले पूर्ण करून विभागात प्रथम क्रमांकावर आला आहे. शबरी आवास योजना ग्रामीण २०१६-२०१७ ते २०१९-२०२० या कालावधीमध्ये जिल्ह्याचे उद्दिष्ट २ हजार ९८२ असून, त्यापैकी २ हजार २८० घरकुले पूर्ण करून विभागात प्रथम क्रमांकावर आला आहे.
पारधी आवास योजनेत ३५ पैकी ३५ घरकुले पूर्ण करून राज्यात व विभागात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच रमाई आवास योजना ग्रामीण २०१६-२०१७ ते २०१९-२०२० या कालावधीमध्ये जिल्ह्याचे उद्दिष्ट ६ हजार ७०८ असून, त्यापैकी ४ हजार ४१८ घरकुले पूर्ण करून विभागात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ. राजाराम दिघे यांनी त्रैमासिकाच्या संपादकीय लेखात विविध घरकुल योजनांमध्ये औरंगाबाद विभागात हिंगोली अग्रेसर असून चांगली कामगिरी केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले आहे. २८ जून २०२१ रोजी जिल्हा परिषद येेथे सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास या त्रैमासिकाचे जिल्हास्तरीय विमोचन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा, प्रकल्प संचालक धनवंतकुमार माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. पी. पोहोरे, सहायक प्रकल्प अधिकारी जी. पी. बोथीकर, लेखाधिकारी मनोज पिंनगाळे, जिल्हा कार्यक्रमाधिकारी गणेश पाटील, संतोष काळे, फारानोद्दिन सय्यद, सचिन इंगोले आदी उपस्थित होते.
फोटो ७