महाआवास अभियान ग्रामीण गुगल मिट ॲपद्वारे जिल्हास्तरीय कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:26 AM2020-12-23T04:26:07+5:302020-12-23T04:26:07+5:30

यावेळी या कार्यशाळेसाठी तहसीलदार कृष्णा कानगुले, गटविकास अधिकारी जगदीश साहू, कुणाल चंद्रा बँक ऑफ महाराष्ट्र, पी.एन. पाटील एसबीआय बँक, ...

District level workshop through Mahawas Abhiyan Grameen Google Meet app | महाआवास अभियान ग्रामीण गुगल मिट ॲपद्वारे जिल्हास्तरीय कार्यशाळा

महाआवास अभियान ग्रामीण गुगल मिट ॲपद्वारे जिल्हास्तरीय कार्यशाळा

Next

यावेळी या कार्यशाळेसाठी तहसीलदार कृष्णा कानगुले, गटविकास अधिकारी जगदीश साहू, कुणाल चंद्रा बँक ऑफ महाराष्ट्र, पी.एन. पाटील एसबीआय बँक, बाळासाहेब साळवे, विलास काचगुंडे, दत्ता सेगुकर, गजानन वाखरकर ,गंगाधर देवकते, गजानन नायक, प्रभाकर स्वामी, नागनाथ मुळे तसेच आनंदपुरी विस्ताराधिकारी, प्रदीप बोंढारे विस्तार अधिकारी तथा नोडल अधिकारी, शिवलिंग थोरात, सचिन कोकडवार, अजय पहारे, पठाण हनीफ, वामन हिवरे, गजानन कल्याणकर, संदेश जाधव आदी उपस्थित होते.

ही ऑनलाईन बैठक जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी या बैठकीत जिल्हाधिकारी जयवंशी यांनी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, घरकुलांच्या उद्दिष्टाप्रमाणे शंभर टक्के मंजुरी देणे,मंजूर घरकुलांना शंभर टक्के लाभार्थीना पहिला हप्ता वितरित करणे,घरकूल पूर्ण करणे, कृती संगम करुन इतर योजनांचा लाभ देणे आदीवर चर्चा झाली. या मुद्यावर मार्गदर्शन केले. या गुगल मिट ॲपच्या कार्यशाळेसाठी औंढा पंचायत समितीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

फोटो नं. ८

Web Title: District level workshop through Mahawas Abhiyan Grameen Google Meet app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.