ग्रामीण अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:25 AM2020-12-23T04:25:54+5:302020-12-23T04:25:54+5:30
२०२२ पर्यत सर्वाना घरकुल मिळावे या अनुषंगाने महाआवास अभियान अतिशय महत्वपूर्ण असून तालुक्याने त्या अनुषंगाने नियोजन करावे, ...
२०२२ पर्यत सर्वाना घरकुल मिळावे या अनुषंगाने महाआवास अभियान अतिशय महत्वपूर्ण असून तालुक्याने त्या अनुषंगाने नियोजन करावे, अशा सूचना जि.प. चे मु्ख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. शर्मा यांनी संबंधितांना केल्या. अभियानाचे स्वरुप व विविधस्तरावर मिळणारे गुण याबद्दल प्रकल्प संचालक धनवंत माळी यांनी मार्गदर्शन केले.
केेंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण, ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासनाचा निर्णय क्र. (१०७), १९ नोव्हेंबर २०२० नुसार २० नोव्हेंबर २० ते २८ फेब्रुवारी २०२१ या शंभर दिवसांच्या कालावधीत महाआवास अभियान ग्रामीण जिल्हा तालुका व ग्राम स्तरावर राबवायचे आहे. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिाकारी व प्रकल्प संचालक यांनी गृह निर्माण योजना अधिक गतीमान करण्यासाठी विविध उपक्रम राबवून ग्रामीण घरकुलात गुणवत्ता आणणे तसेच शासकीय यंत्राने बरोबर समाजातील सर्व घटक पंचायतराज संस्था स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, खाजगी संस्था, तंत्रशिक्षण संस्था, बँका, लाभार्थी, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग वाढविणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा कृती संगम घडवून आणणे हा उद्देश असून त्याबद्दल मार्गदर्शन केले.
घेण्यात आलेल्या कार्यशाळेस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार, प्रकल्प संचालक धनवंतकुमार माळी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पोहरे, उमेश स्वामी, राठोड, तहसीलदार, समाज कल्याणचे सहायक आयुक्त, जिल्हा मार्गदर्शी बँक अधिकारी, जिल्हा कामगार अधिकारी, पंचायत समिती व जिल्हा ग्रामीण विकास योजनाचे संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.