धनगर-हटकर समाजाचे जिल्हाभर मोर्चे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:40 AM2018-08-28T00:40:15+5:302018-08-28T00:40:26+5:30
धनगर-हटकर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाह सर्व तहसील कार्यालयांवर २७ आॅगस्ट रोजी धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. हिंगोलीत पारंपरिक वेशभूषेत ढोल जागर आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : धनगर-हटकर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाह सर्व तहसील कार्यालयांवर २७ आॅगस्ट रोजी धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. हिंगोलीत पारंपरिक वेशभूषेत ढोल जागर आंदोलन करण्यात आले.
आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. वसमत, कळमनुरी, सेनगाव व औंढानागनाथ येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी आंदोलने केली जात आहेत. परंतु अद्याप धनगर समाजबांधवांची मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे राज्यव्यापी आंदोलनात हिंगोली जिल्ह्यातील धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हिंगोलीत जिल्हा कचेरीसमोर युवकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. विवध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनावर शशिकांत वडकुते, अशोक नाईक, अॅड. ढाले, अशोक श्रीरामे, विनोद नाईक, शिवाजी ढाले, संभाजी देवकते व समाजबांधवांच्या स्वाक्षºया आहेत.
वसमत : मोर्चा काढून दिले निवेदन
वसमत : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन मोर्चा काढून उपविभागीय अधिकाºयामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. संपूर्ण राज्यात होत असलेल्या आंदोलनाप्रमाणे हा मोर्चा काढला. आरक्षणासह
मेंढीपाळांसाठी प्रत्येक जिल्ह्यात गायरान जमीन चराईसाठी राखीव ठेवणे, मेंढी विकास महामंडळास दोन हजार कोटींचे अनुदान द्या, सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे आदी मागण्यांचे निवेदन दिले. सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
...तर तीव्र आंदोलन
आरक्षण न मिळाल्यास आणखी आंदोलनाचा इशारा वसमत येथे समाजबांधवांनी देण्यात आला. यावेळी सर्व उपस्थित धनगर समाजाच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.