आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये? अतिवृष्टीतून वगळल्याने मुख्यमंत्र्यांना रक्तपत्र पाठविले

By यशवंत भीमराव परांडकर | Published: September 13, 2022 06:40 PM2022-09-13T18:40:31+5:302022-09-13T18:41:50+5:30

यावर्षी सेनगाव तालुक्यात ढगफुटीसदृश सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Do we live in Maharashtra or Bihar? Blood letter sent to Chief Minister due to exclusion from heavy rains affected region | आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये? अतिवृष्टीतून वगळल्याने मुख्यमंत्र्यांना रक्तपत्र पाठविले

आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये? अतिवृष्टीतून वगळल्याने मुख्यमंत्र्यांना रक्तपत्र पाठविले

googlenewsNext

गोरेगाव (जि. हिंगोली) : गोरेगावसह सेनगाव तालुक्यातील तीन ते चार सर्कल अतिवृष्टीतून वगळल्याची माहिती पसरली असताना शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तर एका शेतकरी तरुणाने चक्क रक्ताने पत्र लिहीत आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये, असा थेट प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे करीत अतिवृष्टीचे अनुदान सरसकट देण्याची मागणी केली आहे.

यावर्षी सेनगाव तालुक्यात ढगफुटीसदृश सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांच्या नासाडीमुळे उत्पन्न घटीची शक्यता बघता पुरता हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळेल, अशी आशा होती. परंतु शासनाकडून सेनगाव तालुक्याला अतिवृष्टीसाठी एकूण ३२ कोटी २३ लाख ४७ हजार २०० रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आल्याचे म्हटले जात असताना गोरेगावसह बाभूळगाव आजेगाव व पुसेगाव हे चार सर्कल अतिवृष्टीतून वगळल्याची माहिती आहे. खरीप पिकांचे नुकसान होऊनही अतिवृष्टीतून वगळल्या गेल्याच्या बातमीमुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत ताकतोडा येथील नामदेव पतंगे या तरुण शेतकऱ्याने आपल्या रक्ताने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये, असा प्रश्न केला आहे. सेनगाव तालुक्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतपिकाची नासाडी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अतिवृष्टीतून काही मंडळांना डावलण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे. आधीच नापिकी, त्यातच कर्जाचे हप्ते वसुलीसाठी तगादा लावीत खासगी फायनान्स कंपन्यांनी नाकीनऊ आणले असून, अशावेळी आम्ही जगायचे कसे ते सांगा? आम्ही रक्ताचा अभिषेक करून आमचा जीव सोडून देऊ, असेही पत्रात नमूद करण्यात आले. तसेच पीक नुकसानीबाबत अतिवृष्टी अनुदान सरसकट देण्याची मागणी करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲपद्वारे तहसीलदारांना पत्र...
रक्ताने लिहिलेले पत्र सेनगावचे तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्याकडे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठविले आहे. हेच पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठविले आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने या पत्राची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना अनुदान लवकरात लवकर द्यावे. रक्ताने लिहिलेले पत्र नायब तहसीलदार सुनील कावरखे यांना सुपुर्द केल्याची माहिती नामदेव पतंगे यांनी दिली.

Web Title: Do we live in Maharashtra or Bihar? Blood letter sent to Chief Minister due to exclusion from heavy rains affected region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.