राऊंडच्या नावाखाली डाॅक्टरच गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:28 AM2020-12-22T04:28:35+5:302020-12-22T04:28:35+5:30

सरकारी दवाखान्यातील अस्थिरोग, सर्जन, स्त्रीरोग, बालरोग आणि फजिशियन हे अति महत्वाचे विभाग आहेत. अस्थिविभागास सकाळी १०.२० वाजता भेट ...

The doctor disappeared under the name of Round | राऊंडच्या नावाखाली डाॅक्टरच गायब

राऊंडच्या नावाखाली डाॅक्टरच गायब

Next

सरकारी दवाखान्यातील अस्थिरोग, सर्जन, स्त्रीरोग, बालरोग आणि फजिशियन हे अति महत्वाचे विभाग आहेत. अस्थिविभागास सकाळी १०.२० वाजता भेट दिली असता एक डाॅक्टर या ठिकाणी रुग्णाची तपासणी करताना आढळून आले. यानंतर १०.२५ वाजेच्या सुमारास सर्जन विभागास भेट दिली असता दोन डाॅक्टरांपैकी एकही डाॅक्टर या ठिकाणी हजर नव्हता. यानंतर १०.३५ वाजता स्त्रीरोग विभागास भेट दिली असता येथेही डाॅक्टर हजर नव्हते. डाॉक्टर कुठे गेले आहेत, केव्हा येेतील असे विचारले असता आम्हाला माहिती नाही, थोड्या वेळात येवून जातील असे उपस्थित परिचारिकेने सांगितले. बालरोग विभागात चार डाक्टरांची नियुक्ती केलेली आहे. परंतु, सकाळी १०.४० वाजता येथे एकही डाॅक्टर उपस्थित नव्हते. यानंतर १०.४५ वाजता फिजिशियन विभागास भेट दिली असता येथील डाॅक्टरही राऊंडला गेले आहेत. राऊंड संपला की येणार आहेत, असे सांगण्यात आले. दिलेल्या वेळेत कॅबीनला उपस्थित रहायला पाहिजे आहे. जर डाॅक्टर जागेवर राहत नसतील तर रुग्णांची काळजी कोण घेत असेल असा प्रश्न पडणे सहाजिजकच आहे.

शासकीय रुग्णालयात वर्ग १ ची १८ पदे असून त्यापैकी ७ भरलेली आहेत तर ११ रिक्त आहेत. तसेच वर्ग २ ची ३५ मंजूर पदे असून ही सर्व भरलेली आहेत. वर्ग ३ मध्ये २२७ पदे असून १०० भरलेली आहेत. तर १२७ रिक्त आहेत. वर्ग ४ ची १४१ पदे असून ४३ भरलेली आहेत. तर ९८ पदे रिक्त आहेत. एकूण ४२१ पदांपैकी १८५ पदे भरलेली असून २३६ पदे रिक्त आहेत.

सरकारी दवाखान्यातील अस्थिरोग, सर्जन, फिजिशियन, बालरोग आणि स्त्रीरोग या विभागातील डाॅक्टरांना रुग्णांच्या सेवेकरीता वेळेवर हजर राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ज्या-त्या विभागात हजर राहत नसतील तर त्या संदर्भात कडक अंमलबजावणी केली जाईल.

- डाॅ.राजेंद्र सूर्यवंशी,जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: The doctor disappeared under the name of Round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.