वयाच्या चाळीशीनंतरही ड्रायव्हींग लायसन्स काढण्यासाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:33 AM2021-08-19T04:33:06+5:302021-08-19T04:33:06+5:30
हिंगोली: गत काही महिन्यांपासून घरबसल्या ऑनलाईन लायसन्स काढले जात आहे. वयाच्या चाळीशीनंतर वाहन परवाना काढायचा असेल किंवा त्याचे नूतनीकरण ...
हिंगोली: गत काही महिन्यांपासून घरबसल्या ऑनलाईन लायसन्स काढले जात आहे. वयाच्या चाळीशीनंतर वाहन परवाना काढायचा असेल किंवा त्याचे नूतनीकरण करुन घ्यायचे असेल तर एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र (वैद्यकीय) आवश्यक केले आहे. लायसन्स काढण्यासाठी कोणालाही वयाची अट नाही. परंतु, त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे, असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून सांगण्यात आले. ‘बीएएमएस’ डॉक्टरांचे प्रमाणपत्र चालणार नाही, असेही आरटीओ कार्यालयाने स्पष्ट केले.
लर्निंग लायसन्स ऑनलाईन...
गत काही महिन्यांपासून लर्निंग लायसन्स हे ऑनलाईन झाले आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयात तास न तास बसण्याची वेळ येत नाही. काही अडचणी आल्यास आरटीओ कार्यालयात आल्यास अडचणी सोडविल्या जातील, असे कार्यालयातून सांगण्यात आले.
किती वयापर्यंत मिळते लायसन्स..
लायसन्स काढण्यासाठी वयाची अट नाही. लायसन्स काढण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र मात्र असणे आवश्यक आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर लायसन्स काढणे शक्य आहे.
सर्व प्रमाणपत्र तपासले जातात...
लायसन्स काढणे प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. लायसन्स ऑनलाईन काढले जात असले तरी परमंट लायसन्ससाठी आरटीओ कार्यालयात यावे लागते. यावेळी आरटीओ कार्यालयातील अधिकारी सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करतात. यावेळी एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र आहे का, याची तपासणी अधिकारी करतात.
प्रतिक्रिया...
लायसन्ससाठी उच्चतम वयाची काही अट नसते. वयाच्या चाळीशीनंतरही लायसन्स काढता येते. परंतु, त्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांकडून प्रमाणपत्र घेणे हे मात्र बंधनकारक असते.
-अनंता जोशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी