रेशनधान्य देत नाही, म्हणून दुकानदारच बदलून टाकला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:34 AM2021-07-14T04:34:45+5:302021-07-14T04:34:45+5:30

हिंगोली : तालुक्यातील २५ रेशन लाभार्थ्यांनी रेशन दुकानदार वेळेवर धान्य देत नसल्याच्या वा इतर कारणावरून दुकानदारच बदलला आहे. हिंगोली ...

Doesn't give rations, so the shopkeeper changed! | रेशनधान्य देत नाही, म्हणून दुकानदारच बदलून टाकला!

रेशनधान्य देत नाही, म्हणून दुकानदारच बदलून टाकला!

Next

हिंगोली : तालुक्यातील २५ रेशन लाभार्थ्यांनी रेशन दुकानदार वेळेवर धान्य देत नसल्याच्या वा इतर कारणावरून दुकानदारच बदलला आहे. हिंगोली तालुक्यातील हे चित्र असले, तरी जिल्ह्यातही अशा तक्रारी असल्याचे समोर आले आहे. मात्र, दुकानदार बदलूनही लाभार्थ्यांना दुसऱ्या दुकानातून धान्य मिळण्यास दोन महिने वाट पाहावी लागत आहे.

जिल्ह्यात पुरवठा विभागाच्या वतीने गरजूंना स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी रेशन दुकानदारांमार्फत धान्य पुरविले जाते. यात दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींसह, प्राधान्य कुटुंबातील सदस्य, शेतकरी कुटुंबातील सदस्यांसह पात्र लाभार्थ्यांना रेशन उपलब्ध करून दिले जाते. कोरोनामुळे तर शासनाने नोव्हेंबरपर्यंत मोफत अन्नधान्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. रेशनचे धान्य घेण्यासाठी इ-पॉस मशीनवर अंगठा लावला लागत असला, तरी अनेक दुकानदार धान्य वेळेवर देत नसल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. वेळेवर धान्य मिळत नसल्याने, तसेच इतर कारणांनी लाभार्थी रेशन दुकानच बदलत आहेत. हिंगोली तालुक्यात जवळपास २५ लाभार्थींनी असे अर्ज तहसीलच्या पुरवठा विभागाकडे सादर केले आहेत.

शहरात जास्त बदल

ग्रामीण भागात एक किंवा जास्तीतजास्त दोन रेशन दुकाने आहेत. या दुकानांमार्फत अन्नधान्य पुरविले जाते. त्यामुळे अशा ठिकाणी रेशनचे दुकान बदलण्याच्या भानगडीत लाभार्थी पडत नाहीत. मात्र, शहरातील लाभार्थी दुकान बदलून देण्यासाठी पुरवठा विभागाकडे तगादा लावत आहेत. सध्याच्या काळात रेशनदुकानदार बदलावयाचे झाल्यास पुर्ण प्रक्रीया होण्यासाठी किमान दोन महिने लागत असल्याचे सांगण्यात आले. यात लाभार्थ्यांना दोन महिने लाभापासून मुकावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुकानदार बदलून घेण्यासाठी आलेले लाभार्थी पुन्हा परत जात आहेत.

नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य

कोरोना काळात सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, तरी परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही वेळ लागणार आहे. या काळात लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गंत जुलै ते नोव्हेंबर, २०२१ पर्यंत पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील एकूण रेशन कार्डधारक - १,८८,८७३

अंत्योदय -२६,३५९

अन्नसुरक्षा - १,३१,८३८

शेतकरी - ३०,७७६

हिंगोली तालुक्यात दुकानदार बदलला - २५

Web Title: Doesn't give rations, so the shopkeeper changed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.