नर्सी येथे शेतकरी ग्राम विकास पॅनलचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:31 AM2021-01-19T04:31:55+5:302021-01-19T04:31:55+5:30
येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण ३२ उमेदवारांनी निवडणूक लढवली असून अतिशय अटीतटीच्या लढतीत अनेक माजी ग्रामपंचायत सदस्यांना पराभव पत्करावा लागला. ...
येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण ३२ उमेदवारांनी निवडणूक लढवली असून अतिशय अटीतटीच्या लढतीत अनेक माजी ग्रामपंचायत सदस्यांना पराभव पत्करावा लागला. तर काही तरुण नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. येथील वार्डनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे वार्ड क्रमांक १ मधून शेतकरी ग्राम विकास पॅनलचे रत्नमाला संतोष लाड, तर आदर्श ग्राम विकास पॅनलचे गीता गणेश नागरे, राहुल वैजनाथ मोरे, वार्ड क्रमांक २ मधून शेतकरी ग्राम विकास पॅनलचे ज्ञानेश्वर भिकाजी कीर्तनकार,तर आदर्श ग्राम विकास पॅनलच्या लताबाई प्रकाश गायकवाड, वार्ड क्रमांक ३ मधून शेतकरी ग्राम विकास पॅनलचे आसिफखान मजरखान पठाण, ऐजाज बेगम रहीम खान पठाण, वार्ड क्रमांक ४ मधून तिसऱ्या धर्मनिरपेक्ष आघाडीचे सय्यद इरफान सय्यद अब्दुल हाफिज, अनुसयाबाई सुभाष हुले, व आदर्श ग्राम विकास पॅनलच्या रूपाली वैजनाथ लांभाडे, तर वार्ड क्रमांक ५ मधून शेतकरी ग्रामविकास पॅनलचे अब्दुल रहीम अब्दुल मन्नान तांबोळी, पंजाब मनोहर गायकवाड, व अनुसयाबाई रामकिसन गाडे हे तीनही पॅनलचे उमेदवार विजय झाले आहे. यामध्ये शेतकरी ग्राम विकास पॅनलचे सात उमेदवार आदर्श ग्राम विकास पॅनलचे चार उमेदवार व धर्मनिरपेक्ष आघाडीचे दोन उमेदवार असे एकूण १३ उमेदवार विजयी झाले आहेत. एकंदरीत शेतकरी ग्रामविकास पॅनलने सात जागा जिंकून आपले वर्चस्व राखले आहे.