कमी टक्क्यांत कर्जाचा मेसेज आला म्हणून ॲप डाऊनलोड करू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:27 AM2021-07-26T04:27:25+5:302021-07-26T04:27:25+5:30

हिंगोली : कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. आता नव्याने व्यवसायाची सुरवात करण्यासाठी धडपड चालली आहे. त्यातच ऑनलाइन ठग ...

Don't download the app as you get the message of low percentage loan! | कमी टक्क्यांत कर्जाचा मेसेज आला म्हणून ॲप डाऊनलोड करू नका !

कमी टक्क्यांत कर्जाचा मेसेज आला म्हणून ॲप डाऊनलोड करू नका !

Next

हिंगोली : कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. आता नव्याने व्यवसायाची सुरवात करण्यासाठी धडपड चालली आहे. त्यातच ऑनलाइन ठग सक्रिय झाले असून, कर्ज देण्याच्या नावाखाली फसवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. कर्ज मिळवून देण्यासंदर्भात अथवा कर्जासाठी ॲप डाऊनलोड करा, अशी लिंक आल्यास पूर्ण खात्री करूनच निर्णय घ्यावा, असा सल्ला सायबर सेलमधील तज्ज्ञांनी दिला आहे.

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर सायबर चोरटे सक्रिय झाले आहेत. नामांकित कंपनी, वित्तीय संस्था, बँकाच्या नावाने बनावट वेबसाइट बनवून कर्जाचे आमिष दाखविले जात आहे. ऑनलाइन कर्ज घेण्यासाठी गुगलवर सर्च करणारी मंडळी अशा बेवसाइटच्या बळी पडतात. कर्ज मंजूर झाले असून, प्रोसेसिंग फी जमा करावी लागेल असे सांगून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली आपली फसवणूक केली जात आहे. सायबर चोरटे स्मार्टफोन न वापरणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांचा संपर्क नंबरवरून व्हॉट्सॲप मेसेज पाठवित आहेत. कर्जासंबंधी मेसेज असल्याने अनेकजण याला बळी पडत आहेत. विशेष करून ग्रामीण भागात सध्या नामांकित वित्तीय संस्थाच्या नावाने मेसेज पाठविले जात असून, तुम्हाला कर्ज मंजूर झाले असून, काही कागदपत्रे अपलोड करा, असे सांगितले जात आहे.

ॲप डाऊनलोड करताच बँक खाते साफ

- सायबर ठग कमी व्याजदरात कर्ज, विना कागदपत्रे कर्ज, त्वरित कर्ज देण्यासंदर्भात मेसेज डाऊनलोड करायला सांगतात. यावेळी आपण कोणतीही खातरजमा न करता अलाऊ करत जातो. यातून आपणच समोरील व्यक्तीला सर्व परवानग्या देतो.

- आपणाला आलेला ओटीपी हा ॲटो जनरेट असल्याने आपोआप अपडेट होतो. त्यामुळे त्यांना आपला ओटीपी मिळतो. त्यानंतर ते पैसे काढून घेत असतात.

-

यांच्याप्रमाणे तुम्हीही फसू शकता !

केस १ : हिंगोली शहरातील एका कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून कोणीतरी दोन वेळेस परस्पर पैसे काढून घेतले. त्यांनी दोनवेळा एटीएमसह पिन नंबरही बदलला. तसेच बँकेत विचारणा केली असता तुमच्याच एटीएमवरून पैसे काढल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे खात्यात जमा होणारे पैसे चालले कोठे याचा त्यांना अद्याप शोध लागला नाही.

केस २ : कळमनुरी तालुक्यातील एकाला तुम्हाला लॉटरी लागली असून, शासनाचा कर म्हणून अगोदर काही रक्कम भरावी लागेल, असे सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी काही रकमेचा भरणा केला. मात्र त्यानंतर समोरील व्यक्तीचा नंबरच लागत नव्हता. लॉटरीच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे त्यांना नंतर समजले.

या आमिषांपासून सावधान !

-कोणत्याही कागदपत्रांशिवाय कर्ज मिळेल, असा मेसेज करून लिंक आली तर ती ओपन करू नये.

-कमी टक्के व्याजदरात कर्ज असा मेसेज आल्यास त्याची खातरजमा करावी. यात फसवणूक होण्याची शक्यता असते. कुठल्याही गॅरंटीशिवाय प्रत्यक्ष भेटीगाठी न घेता केवळ पॅन कार्ड, आधार कार्ड व बँक तपशीलावरून कर्ज मिळेल, या अमिषालाही बळी पडू नका.

कर्ज घेताना काळजी घ्यावी

कोणतीही बँक कर्ज देताना विविध कागदपत्रांची मागणी करते. सर्व कागदपत्रे देऊनही कर्ज मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे कर्जासंबंधी आलेल्या मेसेजची खात्री करावी. आपल्या जवळच्या बँक शाखेत, वित्तीय शाखेत जाऊन कर्जासंबधी मेसेज पाठविला का याची खात्री करावी. त्यानंतरच कर्ज घेण्याचा विचार करावा.

- एम. राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक, हिंगोली

ही घ्या काळजी

-संकेतस्थळावरील माहिती काळजीपूर्वक तपासून घेत खात्री करावी.

-संकेतस्थळ अधिकृत आहे की नाही. याची खात्री करावी. त्यानंतरच ॲप डाऊनलोड करावे.

-फसवणुकीचा संशय आल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्या

- बँक कधीही वैयक्तिक माहिती विचारत नाही. त्यामुळे बँक खात्यासंदर्भात कुणालाही वैयक्तिक माहिती देऊ नये.

-एटीएम, पॅनकार्ड, आधार संदर्भात इतरांना माहिती देऊ नये.

Web Title: Don't download the app as you get the message of low percentage loan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.