अनोळखी माणसाला मोबाइल देऊ नका; क्षणात बॅंकखाते होऊ शकते साफ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:32 AM2021-08-22T04:32:30+5:302021-08-22T04:32:30+5:30
हिंगोली : ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढल्या असून, सायबर चोरटे विविध क्लृप्त्या वापरीत आहेत. या आठवड्यातच एकाचा एकाच्या मोबाइलवरून जवळपास ...
हिंगोली : ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढल्या असून, सायबर चोरटे विविध क्लृप्त्या वापरीत आहेत. या आठवड्यातच एकाचा एकाच्या मोबाइलवरून जवळपास एक लाखाची रक्कम हडप केल्याचा प्रकार घडला. आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आला आहे. विविध ॲपच्या माध्यमातून सुविधा मिळत असल्या, तरी तेवढाच धोकाही वाढला आहे. सायबर चोरटे ऑनलाइन फसवणुकीचे विविध फंडे वापरत आहेत. त्यामुळे मोबाइलमधील अनोळखी लिंक, मेसेज ओपन करणे धोकादायक ठरत आहे. जिल्ह्यात अनेकांना ऑनलाइन फसवणुकीचा फटका बसला आहे. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ओटीपी मिळविण्यासाठी अशी केली जाऊ शकते फसवणूक
कॉल करण्यासाठी मोबाइल घेऊन अनोळखी व्यक्ती काॅल करण्यासाठी मोबाइल घेऊन ओटीपी मिळवू शकते.
वेगळी लिंक पाठवून तुमच्या मोबाइलवर मेसेजद्वारे वेगळी लिंक पाठवून ओटीपीची मागणी केली जाते.
लॉटरी लागली आहे, असे सांगून तुम्हाला लाॅटरी लागली आहे. त्यासाठी ओटीपी सांगा, अशी बतावणी केली जाते.
केवायसीसाठी आवश्यक असे सांगून केवायसीसाठी आवश्यक असल्याचे सांगून फसवणूक केली जाते.
ही घ्या काळजी
1 मोबाइलवरून पैशांची देवाण-घेवाण प्रत्येक जण करीत आहे. त्यामुळे आपला मोबाइल अनोळखी व्यक्तीला देणे टाळावे. यातून आपली फसवणूक होऊ शकते.
२ एखादी अडचणीत असलेली अनोळखी व्यक्ती फोन मागत असेल, तर त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.
३ कोणी ओटीपी मागितल्यास ओटीपी सांगू नये. अनोळखी ॲप, मेसेजला प्रतिसाद देऊ नये, यातूनही आपली फसवणूक होऊ शकते.
पोलीस अधीक्षक मोबाइलच्या माध्यमातून फसविण्याच्या घटना घडत आहेत. सोशल मीडिया, तसेच विविध लिंकच्या माध्यमातून बँकेतील रक्कम हडपल्याच्या तक्रारी आहेत. मोबाइलचा गैरवापर टाळण्यासाठी आपला मोबाइल अनोळखी व्यक्तींना देणे टाळावे.
- एम.राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक, हिंगोली.