गतवर्षात १९हजार २२२ लहान मुलांना दिले डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:31 AM2021-02-16T04:31:15+5:302021-02-16T04:31:15+5:30
मार्च महिन्यात कोरोनाने सर्वत्र शिरकाव केला. त्यानंतर जवळपास पाच महिने लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी केली गेली होती. त्यामुळे मातांना बाहेर ...
मार्च महिन्यात कोरोनाने सर्वत्र शिरकाव केला. त्यानंतर जवळपास पाच महिने लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी केली गेली होती. त्यामुळे मातांना बाहेर पडणे मुश्कील होऊन बसले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने २०१९-२० या काळात २३ हजार ३९७ लहान मुलांना डोस दिले तर २०२०-२१ मध्ये १९ हजार २२२ लहान मुलांना डोस दिले. कोरोना काळात मातांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करत बाळांना डोस पाजवून घेतले.
प्रतिक्रिया
लसीकरणानंतर दोन दिवस ताप येतो. मात्र हा ताप नंतर हळूहळू उतरतो. ताप आल्यानंतर आईने घाबरुन जावू नये. वेळेच्यावेळी बाळाला दूध पाजावे. बाळाची काळजी घ्यावी. काही शंका वाटल्यास लगेच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
-डाॅ. दीपक मोरे, बालरोगतज्ज्ञ
प्रतिक्रिया
आता पुढे काय ?
कोरोना आजारामुळे काहीअंशी लसीकरणावर परिणाम झाला आहे. परंतु, आता नियमित लसीकरण सत्राचा जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी लाभ घेणे आवश्यक आहे. तसेच डाॅक्टरांचा सल्लाही घेणे तितकेच गरजेचे आहे, असे डाॅ. मंगेश टेहरे यांनी सांगितले.