चालकाचा खून : कारागृहातील ओळखीनंतर आखला वाटमारीचा प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:34 AM2021-08-21T04:34:20+5:302021-08-21T04:34:20+5:30

हिंगोली : परभणी कारागृहात असताना झालेल्या ओळखीनंतर तिन्ही आरोपींनी वाटमारी करण्याच्या उद्देशाने स्कॉर्पियो वाहन भाड्याने घेऊन चालकाच्या खुनाचा प्लॅन ...

Driver's murder: A plot was hatched after identification in the jail | चालकाचा खून : कारागृहातील ओळखीनंतर आखला वाटमारीचा प्लॅन

चालकाचा खून : कारागृहातील ओळखीनंतर आखला वाटमारीचा प्लॅन

Next

हिंगोली : परभणी कारागृहात असताना झालेल्या ओळखीनंतर तिन्ही आरोपींनी वाटमारी करण्याच्या उद्देशाने स्कॉर्पियो वाहन भाड्याने घेऊन चालकाच्या खुनाचा प्लॅन आखला होता. त्यानुसारच वाहन चालक युसुफ नौरंगाबादी यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिली.

येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात एम. राकेश कलासागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची उपस्थिती होती. कलासागर म्हणाले, हिंगोली शहर पोलीस ठाण्यात युसूफ ननू नौरंगाबादी (रा. गारमाळ)

हे भाड्याने चालवित असलेल्या स्कॉर्पिओ गाडीसह बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाली हाेती. स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसाची तीन पथके स्थापन करून त्यांचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात दिल्या होत्या. तपासात स्कॉर्पिओ गाडी बेंबळी (जि. उस्मानाबाद) येथे रोडलगत बेवारस स्थितीत आढळून आली. त्यानंतर बेपत्ता युसूफ नौरंगाबादी यांचा शोध सुरू केला. यावेळी युसूफ नौरंगाबादी यांचे अपहरण आकाश बाळासाहेब मस्के (रा. गर्देवाडी ता. अंबेजोगाई), जय गणेश शेळके (रा. दाती ता. कळमनुरी), शिवाजी गणपत दशरथे (रा. जोडपरळी ता. वसमत) यांनी केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून शिवाजी दशरथे यास जोडपरळी येथून ताब्यात घेत विचारपूस केली असता आकाश मस्के व जय शेळके यांच्यासह तिघांनी ११ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता हिंगोली येथून स्कॉर्पिओ गाडी परभणी येथे जाण्यासाठी भाड्याने घेतल्याचे सांगितले. तसेच गाडी चोरी करण्याच्या उद्देशाने चालक युसूफ नौरंगाबादी याचे अपहरण करून त्यांचा गळा आवळून खून केला. शिवाय त्यांचा मृतदेह किल्लारी पोलीस ठाणे हद्दीतील एका उसाच्या शेतात टाकून दिल्याचे सांगितले. त्यावरून आकाश मस्के यास शिरसाळा पोलीस ठाणे हद्दीतून एका आखाड्यावरून ताब्यात घेतले. तर जय शेळके यास दाती येथून ताब्यात घेतले. दरम्यान, तिन्ही आरोपी विविध गुन्ह्यामध्ये परभणी कारागृहात होते. तेथेच त्यांची ओळख झाली. कारागृहाबाहेर आल्यानंतर त्यांनी स्कॉर्पिओ गाडी चोरून वाटमारी करण्याच्या उद्देशाने युसूफ नौरंगाबादी यांचे अपहरण करून खून केल्याचे स्पष्ट झाले. तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांचा आणखी काही गुन्ह्यात सहभाग आहे का याचा तपास केला जात आहे.

स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांची कामगिरी

स्थानिक गुन्हे शाखा व हिंगोली शहर पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे, पोलीस उप निरीक्षक शिवसांब घेवारे, पाेउपनि किशोर पोटे, नितीन केणेकर, पोह संभाजी लेकूळे, विठ्ठल कोळेकर, भगवान आडे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर सावळे, ज्ञानेश्वर पायघन, प्रशांत वाघमारे, जाधव, शेख शकील, उमेश जाधव, शेख मुजीब, होळकर, गणेश लेकूळे, निलेश हलगे, जयप्रकाश झाडे, सुमित टाले, रोहित मुदीराज आदींचा समावेश होता.

Web Title: Driver's murder: A plot was hatched after identification in the jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.