रेल्वेच्या धडकेने वसमतजवळ एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:05 AM2019-01-07T00:05:56+5:302019-01-07T00:06:12+5:30
: पूर्णा-अकोला रेल्वे मार्गावर वसमतजवळ उघडी नदीजवळ पटरीवर रेल्वेच्या धडकेने ठार झालेल्या इसमाचे प्रेत रविवारी आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : पूर्णा-अकोला रेल्वे मार्गावर वसमतजवळ उघडी नदीजवळ पटरीवर रेल्वेच्या धडकेने ठार झालेल्या इसमाचे प्रेत रविवारी आढळून आले. मयताची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलिसांतर्फे मयताची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
वसमतजवळील उघडी नदी पुलाजवळ रेल्वे पटरीवर छिन्न विच्छिन्न अवस्थेत एका इसमाचे प्रेत आढळल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर काही वेळातच वसमत ग्रामीण ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. परंतु या दुर्घटनेत मयताचा चेहराही ओळखता येण्यासारखा राहिला नाही. त्यामुळे मयताची अद्याप ओळख पटली नाही. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि बळीराम बंदखडके व त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत. रेल्वेने ठार झालेल्या मयताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.