लसीकरणाच्या केंद्रावर पसरला शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:28 AM2021-05-22T04:28:09+5:302021-05-22T04:28:09+5:30
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत १.२१ लाख डोस देण्यात आले आहेत. त्यात २८ हजार जणांनाच दुसरा डोस दिला आहे. मागील काही ...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत १.२१ लाख डोस देण्यात आले आहेत. त्यात २८ हजार जणांनाच दुसरा डोस दिला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता सुरक्षिततेसाठी लसीकरणाकडे कल वाढला होता. त्यातच ० ते १८ वगळता त्यापुढील सर्व वयोगटासाठी लसीकरण खुले केल्याने लस घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली होती. केंद्रासमोर इतक्या रांगा लागत होत्या की, त्यावर नियंत्रण मिळविणे अवघड बनले होते. राेज शहरात एका केंद्रावर पाचशेच्या आसपास डोस दिले जात होते. त्यामुळे मागील काही दिवसांत लसीकरणाचा वेग चांगलाच वाढला होता. मात्र, मागील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा नागरिकांनी लसीकरणाच्या केंद्राकडे पाठ फिरविली आहे.
एक तर ४४ ते ६० व त्यापुढील वयोगटातील नवीन लाभार्थी लस घेण्यास येत नसल्याचे दिसून येत आहे, तर ज्यांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे, अशांना आता तो ८४ दिवसांनंतर मिळणार असल्याने त्यांचीही अडचण झाली आहे, तर अनेकांना ऑनलाईन अपॉईंटमेंट घेता येत नाही. मात्र, अशांना या केंद्रावरच आधारवरून नोंदणी करून देत लस दिली जात आहे, हे अनेकांना माहिती नसल्यानेही गर्दी मंदावल्याचे दिसत आहे.
एकाच दिवशी ८५० जणांना दिली होती लस
एकाच दिवशी ८५० जणांना तीन केंद्रांवर लस दिली होती, तर चार केंद्रांवरूनही जवळपास तेवढाच आकडा गाठला होता. मात्र, आता तीनशेजणही लसीकरणाला येत नसल्याचे चित्र आहे. शहरात तीन ठिकाणी केंद्र सुरू आहे.