पालकमंत्र्यांसमोर दुष्काळग्रस्तांचे गा-हाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:25 AM2018-10-20T00:25:51+5:302018-10-20T00:26:06+5:30
दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी निघालेले पालकमंत्री दिलीप कांबळे हे आज दुपारी अचानक संतूक पिंपरी शिवारातील एका बांधावर थांबले. शेतात गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी निघालेले पालकमंत्री दिलीप कांबळे हे आज दुपारी अचानक संतूक पिंपरी शिवारातील एका बांधावर थांबले. शेतात गेले. शेतकऱ्यांची कैफियत ऐकली. मोक्याच्या वेळी पावसाने दगा दिल्याने शेतकºयांचा हंगाम हातचा गेल्याचे चित्र समोर आले.
पालकमंत्र्यांसमवेत आ. रामराव वडकुते, आ. तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, कळमनुरीचे एसडीओ प्रशांत खेडेकर, कृषी अधीक्षक अधिकारी विजय लोखंडे, तहसीलदार गजानन शिंदे, बीडीओ डॉ. मिलींद पोहरे, पोनि मारुती थोरात, भाजपचे रामरतन शिंदे, नगरसेवक गणेश बांगर, उत्तमराव जगताप, के.के. शिंदे, माधव कोरडे, बालाजी घुगे आदींसह अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
संतूक पिंपरी येथील एका शेतात पालकमंत्री दिलीप कांबळे लवाजम्यासह गेले होते. तेथे कपासीचे अत्यंत वाईट हाल होते. जेमतेम पाच ते पंधरा बोंडे होती. तर तूर जागीच वाळत होती. त्याला एकही फूल दिसत नव्हते. या शेताची मालकीण गंगासागर यांच्याशी पालकमंत्र्यांनी चर्चा केली. त्यावेळी आढळले की, सासºयाला अर्धांगवायू झाला. सासूचा अपघात झाल्याने पायात रॉड टाकला. पतीचे दहा वर्षांपूर्वीच मरण पावला. दोन मुलांसह कुटुंबाची गुजराण करण्याची जबाबदारी गंगासागर ज्ञानेश्वर झिप्परगे या महिलेवरच पडली आहे. त्यांना दोन एकरात दहा किलो कापूस झाला. आणखी एखादा क्विंटल होईल, अशी स्थिती आहे. दहा हजारांचा खर्च केला. तोही निघेल की नाही, याची शाश्वती नाही. चाळीस ते पन्नास हजारांची मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी पालकमंत्र्यांकडे व्यक्त केली. दुसºया शेतात एकरात दोन क्ंिवटल सोयाबीन झाले. त्यामुळे खर्चही निघाला नाही, असेही त्यांनी सांगितले. तर कोणी मार्गदर्शन करीत नाही. तरीही चाळीस ते पन्नास हजारांचे उत्पादन होते. यंदा मात्र खायचे हाल होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
तर राहोली शिवारातील शेतकरी त्र्यंबक बोरकर यांच्या शेतातही पालकमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी बोरकर म्हणाले, आमचे यंदा मोठे हाल आहेत. सोयाबीनचा उतार चांगला आला नाही. तूरही हातची गेली आहे. खरीपची पिके गेली. आता रबी पीक काही येणार नाही. पाणीच नाही तर देणार कुठून? काहींनी वीजप्रश्नाचा मुद्दाही त्यांच्याकडे मांडला.
त्यानंतर पालकमंत्र्यांनी केसापूर, काळकोंडी, नवलगव्हाण आदी भागात दौरा केला. यावेळी खा.राजीव सातव, आ.संतोष टारफे यांनीही त्यांची भेट घेत वसमत व औंढा तालुक्याला दुष्काळग्रस्तांच्या यादीत घेण्याची मागणी केली. यावेळी विनायक देशमुख, बाबा नाईक, सुरेश सराफ, रवी पाटील आदी उपस्थित होते.
पूर्ण दुष्काळ जाहीर करा : सातव
हिंगोली : खरीप हंगामात उत्पादन खर्च देखील निघण्याची शक्यता नसतांना पाण्याअभावी रबीची अपेक्षाच करता येत नसल्याने लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी खा.राजीव सातव यांनी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे केलीे.
हिवाळ्यातच पाणीटंचाईचे सावट आहे. जनावरांसाठी चारा टंचाईचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे. कर्जमाफीत अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित आहेत.बोंडअळीचे अनुदानही शेतकर्यांना मिळालेले नाही. हमीभाव खरेदी केंद्रही अद्याप सुरू झालेले नाहीत.
लोकसभा क्षेत्रात सर्व तालुक्यांत दुष्काळसदृश्य परिस्थिती असूनही प्रशासनाने चुकीची आणेवारी सादर केल्याने शेतकºयांना पीकविम्यापासून वंचित रहावे लागणार आहे. शासनाने मदत न केल्यास शेतकºयांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचेही सातव यांनी निवेदनात म्हटले आहे.