दुर्लक्षामुळे हिंगोलीत हजारो लिटर पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:58 AM2018-05-12T00:58:55+5:302018-05-12T00:58:55+5:30
शहरातील हिलटॉप कॉलनी येथील पाण्याच्या टाकीतून ११ मे रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास हजारो लिटर पाणी वाया जात होते. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे दरवेळेस अशाप्रकारे पाण्याचा अपव्यय होतो. यापूर्वीही असाच प्रकार घडला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील हिलटॉप कॉलनी येथील पाण्याच्या टाकीतून ११ मे रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास हजारो लिटर पाणी वाया जात होते. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे दरवेळेस अशाप्रकारे पाण्याचा अपव्यय होतो. यापूर्वीही असाच प्रकार घडला होता.
सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. पाण्यावाचून जीव कासावीस होत आहे. ग्रामीण भागातही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्याच्या शोधार्थ ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे. तर हिंगोली नगर परीषद प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे असा पाण्याचा अपव्यय होताना दिसून येत आहे. हिंगोली शहरास सध्या उन्ह्यामध्ये दर आठड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय पाणी बचतीचा संदेशही दिला जात आहे. परंतु ऐन उन्हाळ्यात पाण्याचा असा अपव्यय होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात होता. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
माहिती मिळताच कर्मचारी हजर - हिंगोली शहरातील हिलटॉप कॉलनी येथील शहराला पाणीपुरवठा करणाºया टाकीतून पाणी वाया जात असल्याची माहिती नगर परिषदेच्या संबंधित विभागातील कर्मचाºयांना मिळाली. त्यानंतर काही वेळातच कर्मचाºयांनी धाव घेतली व पाण्याचा कॉक बंद करण्यात आला.