राखीपौर्णिमेमुळे रेल्वेला वाढली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:33 AM2021-08-20T04:33:44+5:302021-08-20T04:33:44+5:30
२२ ऑगस्ट रोजी राखीपौर्णिमा सण असून या सणानिमित्त रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या लक्षणीय अशीच आहे. नांदेड ते अजमेर ...
२२ ऑगस्ट रोजी राखीपौर्णिमा सण असून या सणानिमित्त रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या लक्षणीय अशीच आहे. नांदेड ते अजमेर ही रेल्वे गाडी सोडली तर इतर कोणत्याही एक्स्प्रेसला आरक्षणासाठी वेटिंग नाही. सहजरीत्या आरक्षण तिकीट मिळू लागल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सद्य:स्थितीत प्रवाशांच्या सोयीसाठी नरखेड ते काचीगुडा, पूर्णा ते अकोला, अमरावती ते तिरुपती, कोल्हापूर ते नागपूर, नांदेड ते जम्मूतावी आदी रेल्वे गाड्या सुरू आहेत. अनलाॅक झाल्यामुळे प्रवासी संख्या थोडीबहुत वाढली आहे.
सहजरीत्या मिळत आहे आरक्षण
नांदेड ते अजमेर रेल्वे गाडी वगळता इतर सर्वच रेल्वे गाड्यांना सहजरीत्या आरक्षण मिळत आहे. सध्या नांदेड ते गंगानगर, अमरावती ते तिरुपती, कोल्हापूर ते नागापूर, जम्मूतावी ते नांदेड अशा एक्स्प्रेस रेल्वे गाड्या सुरू आहेत.
७० टक्के प्रवासी संख्या वाढली
कोरोना काळात २० ते २५ टक्के प्रवासी प्रवास करायचे; परंतु सद्य:स्थितीत ७० टक्के प्रवासी संख्या वाढलेली पाहायला मिळत आहे.
डेमू या पॅसेंजर रेल्वेगाडीसह इतर एक्स्प्रेस गाड्यांनाही प्रवासी संख्या वाढलेली दिसून येत आहे. दोन दिवसांवर राखीपौर्णिमा असल्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे हिंगोलीचे स्टेशन मास्टर अलोक नारायणन यांनी सांगितले.