टंचाईतील वारेमाप खर्चाला दिला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:39 AM2018-06-05T00:39:54+5:302018-06-05T00:39:54+5:30

गतवर्षीच टंचाईत उपाययोजना केलेल्या गावाला यंदा पुन्हा उपाययोजना देताना जिल्हा प्रशासनाने तपासण्यांची चाळणी लावली. त्यात अनेक गावांचे प्रस्ताव बाद झाल्याने टंचाईत नाहक वारेमाप खर्च करण्याचे प्रकार बंद झाले. अवघे ९४ बोअर घेण्यात आले असून २८ नळयोजनांची दुरुस्ती करण्यात आली.

 Due to the scarcity of the scales, | टंचाईतील वारेमाप खर्चाला दिला फाटा

टंचाईतील वारेमाप खर्चाला दिला फाटा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : गतवर्षीच टंचाईत उपाययोजना केलेल्या गावाला यंदा पुन्हा उपाययोजना देताना जिल्हा प्रशासनाने तपासण्यांची चाळणी लावली. त्यात अनेक गावांचे प्रस्ताव बाद झाल्याने टंचाईत नाहक वारेमाप खर्च करण्याचे प्रकार बंद झाले. अवघे ९४ बोअर घेण्यात आले असून २८ नळयोजनांची दुरुस्ती करण्यात आली.
जी कामे जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाला करणे शक्य नाही, ती टंचाईतून करण्याचा ट्रेंड निर्माण झाला होता. त्यासाठी आमदारांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकांमधून सरपंच मंडळीही जोरदार आवाज उठवायची. खरेतर अशा अनेक गावांत टंचाईचे उग्र रुपही होते. मात्र गतवर्षी केलेले उपाय वर्षभरातच निकामी होऊन पुढल्या वर्षी पुन्हा पदर पसरणार असाल तर शासनाने नाहक अशा किती उपाययोजना करायच्या? असा प्रश्न जिल्हाधिकाºयांनी उपस्थित करून यावर पाणी फेरले. तर कालावधी कमी उरला अन् बोअरपेक्षा अधिग्रहणाचा खर्च कमी येत असेल तर तसा उपाय करण्यात आला. खर्च बचतीच्या या फंड्यापुढे अनेकांचे टंचाईचे अवाजवी प्रस्ताव तसेच धूळ खात पडून राहिले, हे विशेष.
हिंगोली जिल्ह्यातून बोअरसाठी १७२ प्रस्ताव आले होते. यापैकी ८२ प्रस्तावांना जिल्हाधिकाºयांनी मंजुरी दिली. यात वसमत-९, कळमनुरी-१५, हिंगोली-२२, औंढा नागनाथ-१५, सेनगावातील २१ गावांत बोअर घेण्यास मंजुरी दिली आहे. कुठे एक तर कुठे दोन बोअर आहेत. तर ६९ प्रस्ताव फेरचौकशीसाठी पाठविले होते. त्यातील अनेक ठिकाणी पूर्वीच्या उपायांची निगा नसल्याने टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे आढळले.
यंदा मे महिन्याच्या अखेरीस टँकरची संख्या २१ वर पोहोचली होती. १९ गावे, ४ वाड्यांसाठी ५ शासकीय व १६ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. दिवसाकाठी ३६ खेपा मंजूर होत्या. हिंगोली-४, कळमनुरी -८, सेनगाव- ६, औंढा-३ अशी मंजूर टँकरची तालुकानिहाय संख्या आहे. तर खाजगी विहीर/बोअर अधिग्रहणांची संख्याही आता २७१ वर पोहोचली आहे. यामध्ये २३१ गावांसाठी टँकरसह केलेल्या अधिग्रहणांची ही संख्या आहे. यात हिंगोली-३८, कळमनुरी-५२, सेनगाव-७२, वसमत-६५, औंढा नागनाथ-४४ अशी संख्या आहे.

Web Title:  Due to the scarcity of the scales,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.