स्मार्टकार्डअभावी मुलींना नॅपकीन मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:36 PM2018-08-31T23:36:02+5:302018-08-31T23:36:20+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींना आता ५ रुपयांत अस्मिता योजनेतंर्गत सॅनिटरी पॅड (नॅपकीन) दिल्या जाणार आहे. योजनेचा शुभारंभही झाला. ग्रा. पं. स्तरावरून शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींचा सर्व्हे झाला. कुरूंद्यात जवळपास ११० मुलींच्या नावांची नोंदणी झाली. ग्रामीण भागातील शाळेतील मुलींचा सर्व्हे झाला. मात्र स्मार्टकार्ड उपलब्ध झाल्यावरच शाळेकरी मुलींना ५ रुपयांमध्ये नॅपकीन दिल्या जातील.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : जिल्हा परिषदेच्या शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींना आता ५ रुपयांत अस्मिता योजनेतंर्गत सॅनिटरी पॅड (नॅपकीन) दिल्या जाणार आहे. योजनेचा शुभारंभही झाला. ग्रा. पं. स्तरावरून शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींचा सर्व्हे झाला. कुरूंद्यात जवळपास ११० मुलींच्या नावांची नोंदणी झाली. ग्रामीण भागातील शाळेतील मुलींचा सर्व्हे झाला. मात्र स्मार्टकार्ड उपलब्ध झाल्यावरच शाळेकरी मुलींना ५ रुपयांमध्ये नॅपकीन दिल्या जातील.
आंतरराष्टÑीय महिला दिनाचे औचित्य साधून मार्च महिन्यामध्ये अस्मिता योजनेचा शुभारंभ महाराष्टÑ सरकारने केला आहे. या योजनेचा वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे शुभारंभ झाला असून, नॅपकीन बचतगटांकडे आता उपलब्ध झालेले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींचा सर्व्हे करून नाव नोंदणी करून त्यांना स्मार्टकार्ड दिल्या जार्ईल. त्यावर दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या नॅपकिनची नोंदणी करण्यात येणार येईल. बाजारपेठेमध्ये सॅनिटरी पॅड कमीत कमी ३० रुपयांमध्ये मिळते. बाजारपेठेमध्ये दर पाहता सवलतीच्या दरामध्ये शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींना ५ रुपयांत नॅपकीन मिळणार आहे. तर १९ वयोगटाच्या पुढील महिलांना नॅपकीन १८ रुपयांच्या दरामध्ये दिल्या जाईल. त्यांनाही बचतगटाकडे नोंदणी करावी लागेल. नॅपकीन विक्री व वाटपाचे काम महिला बचत गटांना दिल्या जाणार आहे. बचत गटाच्या ठिकाणावरून हे नॅपकीन घ्यावे लागणार आहे. महिला बचत गटाला रोजगार उपलब्ध व्हावे, या उद्देशाने त्याकडे हे काम सोपविले आहे. स्मार्टकार्ड उपलब्ध झालेले नसल्याने नॅपकीन मिळताना दिसत नाहीत. सर्व्हे झाले, नॅपकीन आले. मात्र स्मार्ट कार्ड देण्यासाठी संबंधित विभागाने तत्परता दाखवलेली दिसत नाही. त्यामुळे स्मार्ट कार्डची प्रतीक्षा करावी लागत आहे.
स्मार्टकार्ड उपलब्ध झाल्यानंतर ५ रुपयांमध्ये नॅपकीन मुलींना मिळणार की, या कार्डची प्रतीक्षा करण्यातच आणखी काही वर्षे वाया जाणार? हा गंभीर प्रश्न आहे. यावर सध्या कुणीच बोलतही नाही.
महिला बचत गटांमार्फत वाटप
जिल्हा परिषद शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींना आता ५ रुपयांत अस्मिता योजनेतंर्गत सॅनिटरी पॅड (नॅपकीन) दिल्या जाणार आहे. तर महिलांनादेखील योजनेतून १८ रुपयांमध्ये नॅपकीन बचत गटाच्या माध्यमातून मिळणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर शाळेतील मुलींचा सर्वे करून स्मार्टकार्ड दिल्या जाणार व दर महिन्याला ५ रुपयांत स्मार्टकार्डवर नोंदणी करून नॅपकीन बचतगट वाटप करणार आहे.