उपजिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला दिली धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:32 AM2018-11-15T00:32:48+5:302018-11-15T00:33:10+5:30

शहरातील खटकाळी बायपास परिसरात अवैध वाळूची तस्करी करणारे ट्रॅक्टर तहसीलला नेऊन लावण्यास सांगितल्याने कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या वाहनाला धडक देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात वाहनाचे पन्नास हजारांचे नुकसान झाले तर खेडेकर बालंबाल बचावले.

 Due to the sub-divisional vehicle | उपजिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला दिली धडक

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला दिली धडक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील खटकाळी बायपास परिसरात अवैध वाळूची तस्करी करणारे ट्रॅक्टर तहसीलला नेऊन लावण्यास सांगितल्याने कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या वाहनाला धडक देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात वाहनाचे पन्नास हजारांचे नुकसान झाले तर खेडेकर बालंबाल बचावले.
याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी महसूल पथकासह खानापूर चित्ता येथून येणाºया एका ट्रॅक्टरचालकाला खटकाळी बायपास भागात थांबवून चौकशी केली. ट्रॅक्टरमध्ये वाळू असल्याने वाहतूक परवान्याची मागणी खेडेकर यांनी वाहनचालक हरी विठ्ठल पाचपुते यांच्याकडे केली. मात्र परवाना नसल्याने वाहन थांबविले. ट्रॅक्टर चालकाने मालक प्रवीण जाधव यांना फोन करून बोलावून घेतले. त्याच्याकडेही परवाना नसल्याने खेडेकर यांनी ट्रॅक्टर हिंगोली तहसीलला जमा करण्यास सांगितले. त्यानंतर खेडेकर शासकीय वाहनात जावून बसले. तेव्हा ट्रॅक्टर मालकाने चालकासह ट्रॅक्टरवर बसून खेडेकर यांच्या शासकीय वाहनाला जबर धडक दिली. प्रसंगावधान राखून खेडेकर वाहनातून खाली उतरल्याने बालंबाल बचावले. या पथकामध्ये तलाठी सय्यद अब्दुल कारवाडी, तलाठी प्रदीप इंगोले कन्हेरगाव नाका, वाहन चालक मारोती सिरसाठ यांचा समावेश होता. खेडेकर यांच्या वाहन क्रमांक एमएच ३८ जी २९८ चे ५0 हजारांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अवैध वाळूची तस्करी करणारे ट्रॅक्टर चालक सातपुते व मालक प्रवीण जाधवसह अन्य एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Due to the sub-divisional vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.