लग्नाच्या तिथीमुळे प्रवाशांची गर्दी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:34 AM2018-04-25T00:34:51+5:302018-04-25T00:34:51+5:30
या सप्ताहात अनेक लग्नतिथी असल्याने व त्यात मोठ्या प्रमाणात विवाहांचे नियोजन असल्याने प्रवाशांची मात्र गर्दी वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बस, रेल्वेसह खाजगी बस वाहतुकीलाही यामुळे गर्दी दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : या सप्ताहात अनेक लग्नतिथी असल्याने व त्यात मोठ्या प्रमाणात विवाहांचे नियोजन असल्याने प्रवाशांची मात्र गर्दी वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बस, रेल्वेसह खाजगी बस वाहतुकीलाही यामुळे गर्दी दिसून येत आहे.
यंदा कडक उन्हाळा असल्याने व भविष्यात पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याच्या भीतीने अनेकांनी या महिन्यातच लग्न सोहळे उरकण्यावर भर दिल्याचे चित्र आहे. त्यातच मागील महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे तर अनेकांना या सोहळ्याची तयारीही व्यवस्थित करता आली नव्हती. त्यामुळे आता बाजारपेठेतही त्याच प्रमाणात गर्दी होत आहे. लग्न बस्ता, भांडी, सोने-नाणे खरेदी करण्यासाठी एकच गर्दी होताना दिसत आहे. त्यातही या आठ दिवसांतच ही गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. या गर्दीत महिला व लहान मुलांना बसण्यासाठीही जागा मिळत नसल्याने आबाळ होत आहे.