नवरात्रोत्सवानिमित्त राहणार चोख बंदोबस्त; साध्या वेषातील पोलीस ठेवणार वॉच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 07:13 PM2022-09-25T19:13:02+5:302022-09-25T19:15:10+5:30

जिल्ह्यात २६ सप्टेंबरपासून श्री दुर्गादेवी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

During the Navratri festival, there will be proper security and police in plain clothes will keep a watch | नवरात्रोत्सवानिमित्त राहणार चोख बंदोबस्त; साध्या वेषातील पोलीस ठेवणार वॉच

नवरात्रोत्सवानिमित्त राहणार चोख बंदोबस्त; साध्या वेषातील पोलीस ठेवणार वॉच

Next

हिंगोली : जिल्ह्यात २६ सप्टेंबरपासून श्री दुर्गादेवी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त तगडा पोलीस बंदोबस्त राहणार असून छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी साध्या वेषातील चिडीमार पथकेही नियुक्त असणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिली. येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात २५ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या अध्यक्षतेखाली बंदोबस्त आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, हिंगोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे,वसमतचे किशोर कांबळे, प्रभारी पोलीस उपाधीक्षक सोनाजी आम्ले, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक शिवाजी गुरमे, हिंगोली शहरचे पंडित कच्छवे, वसमत शहरचे चंद्रशेखर कदम आदींची उपस्थिती होती.

नवरात्रोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याकरीता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच सर्वच पोलीस ठाणे स्तरावर दंगा नियंत्रण सराव, पथसंचलन, शांतता समितीच्या बैठका घेण्यात येणार आहेत. या काळात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

असा असणार बंदोबस्त 
तालुका व मोठ्या शहरामध्ये विसर्जन मार्गाची पाहणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. पोलीस अधीक्षक कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह ३ उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक असे ४४ पोलीस अधिकारी, ७२७ पोलीस अंमलदार, १ एस.आर.पी.एफ प्लाटुन, आर.सी.पी.चे २ पथक व ६०० गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. 

समाजोपयोगी उपक्रम राबवा
दुर्गादेवी व शारदादेवी मंडळ स्थापना करताना पोलीस विभागाकडून ऑनलाईन परवानगी घ्यावी. तसेच इतर विभागांकडूनही आवश्यक परवानगी घ्यावी. नवरात्रोत्सव काळात प्रतिबंधित डी.जे. चा वापर न करता समाजोपयोगी व आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करावे. पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या सुचनांचे व नियमांचे पालन करावे, असे आवाहनही कलासागर यांनी केले आहे.


 

Web Title: During the Navratri festival, there will be proper security and police in plain clothes will keep a watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.